आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवीच्या मंगळसूत्रासह दानपेटीही पळवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-पडेगावातील सप्तशृंगी मातेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि दानपेटी पळवल्याची घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली. मंदिराची दानपेटी आणि दागिने पळवल्याची नववर्षातील ही दुसरी घटना असून यापूर्वी जवाहरनगरमधील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या तीन दानपेट्या फोडून रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. छावणी, गवळीपुरा येथील नंदकिशोर रामेश्वर शुक्ला (45) हे क्राइस्ट चर्च या शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते पडेगावातील सप्तशृंगीनगरातील चॅरिटेबल ट्रस्टच्या सप्तशृंगीमाता मंदिराचे अध्यक्ष आहेत. या मंदिराच्या सुरक्षेसाठी वॉचमन अथवा सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. या ठिकाणी पुजारी असलेले रमेश विष्णू मुळे हे आज पहाटे पाचच्या सुमारास पूजेसाठी मंदिरात आले. तेव्हा मंदिराच्या ग्रिलचे कुलूप तोडून चोरट्याने देवीच्या गळ्यातील दीड ग्रॅमचे मंगळसूत्र आणि दीड हजार रोख असलेली दानपेटी पळवल्याचे मुळेंच्या निदर्शनास आले.

याची माहिती त्यांनी तत्काळ शुक्ला यांना दिली. यानंतर श्वान पथकासह छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शुक्ला यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे करत आहेत.