आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात चक्क त्रिशूळ घेऊन बसली राधे मॉं, CISF ने अडवले का नाही?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कौटुंबिक छळाच्या आरोपावरून चर्चेत असलेली वादग्रस्त राधे माँ ऊर्फ सुखविंदर कौर हिने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. स्वत:ला अष्टभुजा देवीचा अवतार सांगणारी राधे माँ विमानात त्रिशूळ घेऊन बसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे आधीच अडचणीत असलेली राधे माँ अजून अडचणीत येऊ शकते.

गेल्या रविवारी राधे माँ औरंगाबादहून मुंबईला जेट एअरवेजच्या विमानाने पोहोचली. मात्र, या प्रवासादरम्यान तिच्याकडे सुमारे दीड फूट लांबीचे त्रिशूळ होते. याच विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने यावर सवाल उपस्थित केला. 'विमानात त्रिशूळ घेऊन बसूच कसे दिले? सीआयएसएफने अडवले का नाही?' असे प्रश्न तक्रारदार प्रवाशाने उपस्थित केले. जेट एअरवेज सर्वात सुरक्षित एअरलाइन असल्याचा दावा करते. परंतु राधे माँला त्रिशूळ घेऊन विमानात प्रवास करू देणे कितपत योग्य आहे. राधे माँला त्रिशूळसोबत विमानात चढताना सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सने रोखले नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे या प्रवाशाने म्हटले आहे.

याबाबत औरंगाबाद विमानतळाचे सीआयएसएफचे प्रमुख जाट यांना विचारले असता त्यांनी विमानतळाचे व्यवस्थापक डी. जी. साळवे यांना याबाबत विचारा असे सांगितले. मात्र, साळवे यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. याबाबत राधे माँचे भक्त संजीव गुप्ता यांना विचारले असता त्यांनी सांगितले, विमानात बसताना राधे माँ यांच्याकडून त्रिशूळ सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांनी घेतले होते आणि प्रवास झाल्यानंतर त्यांनी त्रिशूळ परत केले.
धार्मिक भावना दुखावल्यामुळे राधे मॉंने सोडावे लागले होते पंजाब
पंजाबातील मुकेरिया येथे 14 वर्षांपूर्वी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप राधे माँवर ठेवण्यात आला होता. 2001 मध्ये मुकेरिया येथे राधे माँ ने अष्टभुजा मातेच्या फोटोवर स्वतःचा चेहरा लावला आणि देवी भगवतीच्या रुपात स्वतःला सादर केले होते. हे फोटो मुकेरियामध्ये वाटले गेल्यानंतर राधे माँ विरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. फगवाडा येथे 2002 मध्ये राधे माँने सार्वजिनकरित्या माफी मागितली आणि शहर सोडले होते.

काय आहे मुंबईतील प्रकरण?
बोरिवलीच्या निकी गुप्ता यांनी मागील आठवड्यात कांदिवली पोलिस ठाण्यात राधे माँसह गुप्ता कुटुंबातील सात जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. मिठाईचे व्यापारी गुप्ता कुटुंबीय हे राधे माँचे भक्त आहेत. राधे माँच्या आश्रमात सेवेकरी म्हणून राहण्याची कुटुंबीयांनी सक्ती केल्याचे निकी यांनी तक्रारीत म्हटले आहे. सेवेदरम्यान राधे माँने आपल्याला लाथाबुक्क्यांनी तसेच हातातल्या त्रिशुळाने मारहाण केल्याचेही निकी गुप्ता यांचे म्हणणे आहे. तक्रारीचे स्वरूप अतिशय गंभीर असून त्याअंतर्गत राधे माँ हिला अटकही होऊ शकते, अशी माहिती पोलिस विभागातील सूत्रांनी दिली आहे. अटकेच्या भीतीनेच राधे माँ हिने मुंबईबाहेर पळ काढला आहे. त्यांच्या आश्रमाच्या प्रवेशद्वारावरील रखवालदाराने सध्या इमारतीत कोणीही नसून सर्व जण दिल्लीला गेल्याची माहिती दिली आहे.
राधे माँ संबंधीत वाद
- दोन वर्षांपूर्वी राधे माँला महामंडलेश्वर उपाधी देण्यात आली होती, तेव्हा देखील राधे माँवर आरोप झाले होते. संत समुदायातील एका गटाने तिला महामंडलेश्वर उपाधी देण्याला विरोध केला होता. त्यानंतर ती उपाधी काढून घेण्यात आली होती.

- 5 जून 2002 रोजी दोरांगल येथील पोलिस स्टेशनमध्ये राधे माँचा भाऊ सुखबीरसिंग उर्फ बिल्ला आणि वडील अजितसिंग यांच्याविरोधात हुंडाबळीचा खटला दाखल झाला होता.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटोज...