आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gokulashtmi News Story In Marathi, Lord Shri Krishna, Divya Marathi

गोकुळाष्‍टमी विशेष: यंदा साजरी होतेय पाच हजारावी गोकुळाष्टमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भगवान श्रीकृष्णांचा जन्म किती वर्षांपूर्वी झाला? जन्माष्टमी नेमकी कधी व कशी सुरू झाली, त्याचे प्रणेते कोण?, श्रीकृष्णांचे नेमके रूप कसे होते? असे अनेक प्रश्न जिज्ञासूंना पडतात. गोपालकृष्णांच्या विलोभनीय चरित्रात याची उत्तरे मिळतात. त्याआधारे विचार करता यंदा साजरी झालेली गोकुळाष्टमी ही पाच हजारावी आहे.

औरंगाबादेतील अभ्यासकांनी श्रीकृष्ण चरित्र अत्यंत सोपे अन् सुटसुटीत करून सांगितले आहे. त्यातील उल्लेखानुसार यंदाची जन्माष्टमी पाच हजारावी असून नंद-यशोदेने गोकुळात त्याची सुरुवात केली, पण कपिल मुनींमुळे त्याला व्यापक आणि सार्वजनिक रूप प्राप्त झाले. त्या वेळी श्रीकृष्णांच्या लीला, आख्यायिकांबाबत चरित्र अभ्यासकांशी चर्चा केली असता श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनोखे पैलू समोर आले.

श्रीकृष्णांवर पैठणचे महान संत कृष्णदयार्णव यांनी ‘हरिवरदा’ ग्रंथ लिहिला आहे. जातवेद भैरवांनी ‘भैरवी ’ नावाची टीका लिहिली. अहमदाबादच्या हरिदास वैद्य यांनी ‘श्रीमद्भागवतदास’ हा ग्रंथ तर औरंगाबादच्या डॉ. दिवाकर यार्दी यांनी ‘रत्नाकर भागवत’ हा ग्रंथ लिहिला आहे. या सर्वात भगवंताच्या विविध रूपांचे वर्णन आहे. दिगंबर गोसावी यांच्या माहितीनुसार श्रीकृष्णांचे चरित्र तीन रूपांत आहे. आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक ही ती तीन रूपे.

अष्टमीच का? : शुक्ल व वद्य अष्टमीला चंद्र आकाशात दिसतो. अशी ही तिथी असल्याने भगवंतांनी अष्टमीला रात्री बारा वाजता अवतार धारण केला आहे. भगवान राम दुपारी बारा वाजता जन्माला आल्याने त्यांना सूर्यवंशी तर श्रीकृष्ण रात्री बाराला चंद्रप्रकाशात जन्मले त्यामुळे त्यांना चंद्रवंशी म्हणतात, असे गोसावींचे मत आहे.

नारदांनी केले धावपट्ट्यांचे वर्णन : त्या काळातही विमाने होती याचे अनेक दाखले सापडतात. श्रीकृष्णांनी विमान वापरलेले आहे जसे राम अवतारात पुष्पक विमान होते तशी अनेक विमाने श्रीकृष्ण अवतारात वापरली त्यावेळच्या धावपट्ट्यांचे वर्णन नारदमुनींनी केल्याचे आढळते, असे राजरामपंत कुलकर्णी यांनी सांगितले.

शंभर वर्षे जगले श्रीकृष्ण
* कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग अशी चार युगे आहेत. पैकी द्वापार युगात 5 हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णांचा जन्म झाल्याची नोंद आहे. श्रीकृष्ण शतायुषी असल्याचे दाखले पुराणात आहेत.’ - राजारामपंत कुलकर्णी, अभ्यासक
सत्यासाठी खोटेही बोलले
* हा जनसामान्यांचा अवतार आहे. वेळप्रसंगी सत्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी ते खोटेही बोलले. मी शस्त्र घेणार नाही. ही स्वत:ची प्रतिज्ञा त्यांनी प्रसंगावधान पाहून मोडली.’
प्रा. वसंत कुंभोजकर, अभ्यासक,
सोळा हजार विवाह
* भोमासुराने सोळा हजार स्त्रिया कोंडून ठेवल्या होत्या. त्याचा वध करून त्या सर्वांची सुटका कृष्णाने केली. या सर्व स्त्रियांचे पुनर्वसन केले. समाज त्यांना त्रास देईल म्हणून त्यांच्याशी प्रातिनिधिक स्वरुपात विवाह केला.’ दिगंबर गोसावी, अभ्यासक
सोळा हजार विवाह
* भोमासुराने सोळा हजार स्त्रिया कोंडून ठेवल्या होत्या. त्याचा वध करून त्या सर्वांची सुटका कृष्णाने केली. या सर्व स्त्रियांचे पुनर्वसन केले. समाज त्यांना त्रास देईल म्हणून त्यांच्याशी प्रातिनिधिक स्वरुपात विवाह केला.’ दिगंबर गोसावी, अभ्यासक