आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवसाढवळया चोरट्याने लांबवले ‘सजग’ महिलेचे मंगळसूत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील दशमेशनगर या उच्चभ्रू वसाहतीत निवृत्त न्यायमूर्तींचा बंगला शोधणा-या सजग महिला संघर्ष समितीच्या सदस्याचे मंगळसूत्र हिसकावत चोराने औरंगाबाद पोलिसांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. शनिवारी सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
दशमेशनगरमध्ये राहणारे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी सजग महिला संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मीना सुरेश खंडागळे (रा. जेतवन बुद्धविहाराजवळ, लक्ष्मी कॉलनी) या सजग महिला संघर्ष समितीच्या सदस्या आल्या होत्या. मात्र दशमेशनगरमधील नेमके ठिकाण त्यांना माहीत नव्हते.
चपळगावकरांचे निवासस्थान शोधत असतानाच त्यांना एक दुचाकीस्वार दिसला. आपसूकच त्याला पत्ता विचारण्यासाठी त्या त्याच्याजवळ गेल्या. या दुचाकीस्वाराने आधी दुचाकी सुरू केली आणि पत्ता सांगण्याचा बहाणा करीत खंडागळे यांना गुंतवून ठेवले. संधी मिळताच त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून धूम स्टाइलने पळ काढला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.