आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साईबाबांवर सोन्याची नाणी;औरंगाबाद खंडपीठाची शिर्डी संस्थानला परवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - श्री साईबाबांचे चित्र असलेली सोन्याची नाणी तयार करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नरेश पाटील व न्यायमूर्ती ए. आय. एस. चिमा यांनी शिर्डी संस्थानला दिली.

संस्थानकडील 37 किलो सोन्यापासून अशी नाणी तयार करण्याची परवानगी संस्थानच्या समितीने मागितली होती. वर्षाला संस्थानला ग्रंथ, दिनदर्शिका व इतर स्टेशनरी खरेदीसाठी 20 कोटी रुपयांचा खर्च येतो. त्यासाठी स्वत:ची प्रिंटिंग प्रेस किंवा प्राधान्य तत्त्वावर छपाईची परवानगीही न्यायालयाने दिली.

याचिकाकर्ते संदीप कुलकर्णी, संदीप काळे व उत्तम शेळके यांच्यातर्फे अँड. सतीश तळेकर, अँड. किरण नगरकर, अँड. आर. एन. भापकर, अँड. किशोर बोर्डे यांनी काम पाहिले. संस्थानच्या वतीने अँड. संजय चौकीदार तर सरकारतर्फे अँड. अर्चना गोंधळेकर यांनी काम पाहिले.