आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या गजबजणार सोन्याची बाजारपेठ, गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर २० कोटींच्या उलाढालीची आशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- निरीक्षकांनी दुकानावर येऊ नये, घडवणीची उलाढाल मर्यादा ९० लाखांवरून कोटींवर करावी या प्रमुख मागण्यांसाठी सराफ असोसिएशनच्या वतीने महिनाभरापासून संप पुकारण्यात आला होता. त्यांच्या मागण्या तत्त्वत: मान्य करण्यात आल्याने २४ एप्रिलपर्यंत संप मागे घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर कोटींची उलाढाल सुवर्ण बाजारात झाली होती. यंदा पाडव्याला संपामुळे सोने खरेदी होऊ शकली नसल्याने १४ एप्रिलच्या मुहूर्तावर २० कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज सराफ असोसिएशनचे शहराध्यक्ष राजेंद्र मुंडलिक यांनी व्यक्त केला.

शहरात ४५० सुवर्ण व्यापारी आहेत. त्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी संप पुकारला होता. महिनाभरापेक्षा जास्त वेळ चाललेला हा संप कडकडीत बंद पाळत सर्वांनी यशस्वी केला.
दिल्लीत भाजप नेते अमित शहा आणि पीयूष गोयल यांच्याशी शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेत मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र, याविषयी लेखी आश्वासन देण्यात आलेले नाही. मात्र, पाडव्याचा मुहूर्त हुकला आणि आता गुरुपुष्यामृतही जाऊ नये म्हणून चर्चेच्या पार्श्वभूमीवर संप मागे घेण्यात आला आहे. २४ एप्रिलपर्यंत लेखी स्वरूपात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन पुढे सुरू राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.

व्यापारी दूर जातील, खासगी कंपन्या व्यवसायात येतील
दागिन्यांतवापरल्या जाणाऱ्या खड्यांवरही उत्पादन शुल्क चालनासह दरमहा भरावे लागणार आहे. हे काम व्यापारी, ग्राहकांच्या दृष्टीने किचकट ठरेल. पूर्वी वर्षभरातून एकदाच चालान भरावे लागत होते. नफा कमी झाल्याने सामान्य व्यापारी दूर जाईल. खासगी कंपन्या पुढे येतील. गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर कोटींच्या पुढे उलाढाल होणार नाही, असे महाराष्ट्र राज्य सराफ असोसिएशन उपाध्यक्ष अशोक वारेगावकर यांनी सांगितले.