आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब प्रथा; पैठणमध्ये अर्थसंकल्पीय सभेत नगरसेवकांना साेन्याच्या अंगठ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- एकीकडे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या अात्महत्या वाढत असतानाच दुसरीकडे पैठणच्या नगरपालिकेत नगरसेवकांवर चक्क ग्रॅम साेन्याच्या अंगठ्यांची उधळण केली जात असल्याचे उघड झाले अाहे. मंगळवारी ( २८ फेब्रुवारी) पैठण नगरपालिकेत अर्थसंकल्प सादर करण्यात अाला. यानंतर सभेस उपस्थित प्रत्येक नगरसेवकाला बंद पाकिटात चक्क पाच ग्रॅम साेन्याची अंगठी देण्यात अाली आहे. 

शिवसेनेच्या सात नगरसेवकांनी यावर अाक्षेप घेत अंगठ्या नाकारल्या. पालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजाेरा दिला अाहे. मात्र, नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी नगरपालिकेत असा काेणताही प्रकार झाला नसल्याचे म्हटले अाहे. 

मंगळवारी दरवर्षीप्रमाणे २०१७-१८ चा ५१ काेटी ३७ लाख सात हजार रुपये खर्चाच्या तसेच दहा लाख २९ हजार दाेनशे रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्प विशेष सभेचे नगराध्यक्ष सूरज लाेळगे यांच्या अध्यक्षतेखाली अायाेजन करण्यात अाले हाेते. मुख्याधिकारी राहूल सूर्यवंशी यांच्यासह नगरपालिकेतील नगरसेवक, नगरसेविका या विशेष सभेत उपस्थित होत्या. अर्थसंकल्पाचे वाचन झाल्यानंतर सर्व नगरसेवकांच्या पुढ्यात बंद पाकीट ठेवण्यात अाले. या बंद पाकिटात नेमके काय या उत्सुकतेपाेटी सर्व नगरसेवकांनी पाकीट उघडले असता त्यात प्रत्येकी पाच ग्रॅम साेन्याची अंगठी असल्याचे स्पष्ट झाले.
 
यावर शिवसेनेच्या नगरसेवकांनी अाक्षेप घेत अंगठ्या स्वीकारण्यास नकार दिला. नेमक्या काेणत्या कारणांसाठी कुणी या अंगठ्यांचे वाटप केले हे मात्र गुलदस्त्यातच अाहे. याची चर्चा नगरपालिकेच्या वर्तुळात सध्या जोर धरून आहे. मात्र या अंगठ्या कुणी दिल्या याची उत्सुकता पैठणकरांना लागून आहे. 

असे आहेत सोन्याचे दर 
-  सध्या साेन्याचे प्रति पाच ग्रॅम दर - १५ हजार रुपये. 
-  १६ नगरसेवकांच्या अंगठ्यांचा खर्च - २.४० लाख रुपये. 

अंगठ्यांचे वाटप नाही 
सभेदरम्यान अंगठ्यांचे वाटप केलेले नाही. असा काेणताही प्रकार झालेला नाही.
- सूरज लाेळगे, नगराध्यक्ष. 

पाच वर्षांपूर्वी बंद झाली हाेती प्रथा 
साधारण पाच वर्षांपूर्वी पर्यंत अर्थसंकल्पादरम्यान साेन्याच्या अंगठ्या देण्याची प्रथा हाेती. मात्र शिवसेनेने ही प्रथा बंद पाडली. अाता पुन्हा अशा प्रकारची प्रथा सुरू करणे शहराच्या विकासास घातक अाहे. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी अंगठ्या घेण्यास नकार देत अादर्श निर्माण केला अाहे.
- दत्ता गाेर्डे, माजी नगराध्यक्ष, न.प. पैठण. 

पैठण नगरपालिकेत सध्याचे पक्षीय बलाबल 
काँग्रेस - 4
भाजप - 5
शिवसेना - 7 
राष्ट्रवादी -  6
अपक्ष - 1
एकूण - २३ 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...