आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोलकरणींच्या मदतीने डल्ला, प्रभाकर मांडे यांचे २७ तोळे सोने केले लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर मांडे यांचे बँकेचे लॉकर दोन मोलकरणींना हाताशी धरून लुटल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी भावना भावसार आणि अरुणा जाधव या दोन मोलकरणी आणि संभाजी पवार यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही मोलकरणी पोलिसांच्या ताब्यात असून संभाजी जाधव फरार झाला आहे. प्रभाकर मांडे यांचे वय ८३ वर्षे आहे. ते पत्नी आणि भावजय यांच्यासोबत सिडको एन-५ येथे राहतात.

एक मुलगा दिल्लीत, तर दुसरा अहमदनगर येथे नोकरीस अाहे. देखभाल आणि घरकामासाठी घरात मोलकरणी आहेत. त्यांनी संभाजी पवार याच्यासोबत कट रचून १९ ऑक्टाेबर रोजी मांडे यांच्या घरातून त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियामधील लॉकरची चावी चोरली. लॉकर मांडे यांच्या पत्नीच्या नावावर आहे. त्यांच्या खोट्या सह्या करून लॉकरमध्ये ठेवलेले २२ तोळे सोन्याचे दागिने या भामट्यांनी पळवले. तीन महिन्यांपूर्वी मांडे यांच्या सुनेच्या पाच तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्याही घरातून चोरीला गेल्या होत्या. त्यादेखील याच मोलकरणीने चोरल्या असाव्यात असा अंदाज आहे. या प्रकाराची माहिती मांडे यांना उशिरा कळाली. त्यांनी सिडको पोलिस ठाणे गाठत मोलकरीण भावना भावसार, अरुणा जाधव आणि संभाजी पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
बँकेच्या कर्मचाऱ्याचे दुर्लक्ष
बँकेचे लॉकर ओळखपत्राशिवाय उघडता येत नाही. ज्याचे लॉकर आहे तीच व्यक्ती आली आहे का याचीही खात्री केली जाते. लॉकर उघडण्यासाठी बँकेजवळील एक चावी आणि ग्राहकाकडील एक चावी आवश्यक असते. त्याशिवाय ते उघडत नाही. एवढी खबरदारी असतानाही मांडे यांचे लॉकर या भामट्यांकडून कसे काय उघडले गेले? असा प्रश्न आहे.