औरंगाबाद - अबकारी कर आकारणीचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी देशभरातील सराफा व्यापाऱ्यांनी गेल्या ३५ दिवसांपासून दुकाने बंद ठेवली आहेत. त्यात औरंगाबादचे व्यापारीही सहभागी आहेत. प्रत्यक्षात अनेक दुकानांमध्ये छुप्या मार्गाने सोन्या-चांदीची खरेदी विक्री सुरू असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये निदर्शनास आले. लग्नसराई आणि पाडव्याच्या मुहूर्ताचा फायदा घेत काही व्यापारी चढ्या भावाने विक्री करत आहेत.
सोन्या-चांदीची दुकाने आणि ग्राहकांचे अतूट नाते आहे. मुलीच्या लग्नाची तजवीज तसेच वाढीव परताव्याची हमी असल्याने प्रत्येक शहरातील शेकडो कुटुंबे दरमहा सोने खरेदी करतातच. सध्या लग्न सोहळ्याचा मोसम आहे. आठ एप्रिलला गुढीपाडवा असल्याने तो मुहूर्त साधून खरेदी होतेच. मात्र, दुकाने तर बंद आहेत. अशा वेळी ग्राहकांना सोने कुठून मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्याचे उत्तर शोधण्यासाठी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने काही सराफा व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा दुकानाच्या मागील बाजूने ग्राहकांना प्रवेश दिला जात असून थोडी जास्त रक्कम घेऊन सोने विकले जात असल्याचे दिसून आले.
दुकान-१ : स्थळ : जालना रोड
प्रतिनिधी: सोन्याचाशिक्का आणि कानातले मिळेल का?
कर्मचारी: शेवटच्याकाउंटरवर जा. २९,००० रुपये भाव आहे. पावती मिळून जाईल.
प्रतिनिधी: संपमिटला नाही तरी दुकान उघडे?
कर्मचारी: धंदामार खातोय ना. अामच्या संघटनेचे कुणी आले तर बंद करू लगेच.
पुढे वाचा.. कुठे चालू आहे छुपी विक्री