आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज : भिजपावसात बजावला मतदानाचा हक्क, गुरुवारी निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांजणगावात मतदानासाठी रांग लागली. छाया : धनंजय दारुंटे - Divya Marathi
रांजणगावात मतदानासाठी रांग लागली. छाया : धनंजय दारुंटे
वाळूज - औद्योगिक परिसरातील २२ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान झाले. पावसामुळे मतदारांची काही प्रमाणात अडचण झाली. परंतु भिजपावसात अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. तुर्काबाद येथे सर्वाधिक ८२ टक्के तर रांजणगाव शेणपुंजी येथे सर्वात कमी ६७ टक्के मतदान झाले.
रांजणगाव शेणपुंजी, पंढरपूर, जोगेश्वरी, वाळूज या भागात कामगार मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे या भागात सकाळी नऊपर्यंत मतदारांचा उत्साह जोरदार होता. अनेक भागांत सकाळीच सरासरी मतदान २० ते २५ टक्क्यांच्या घरात गेले, तर दुपारी महिलावर्ग बाहेर पडल्याने वाजेपर्यंत टक्केवारी ४५ च्या घरात पोहोचली. पाऊस आल्याने अनेक मतदार दुपारच्या सुटीच्या सत्रात मतदानासाठी आले होते. येत्या ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतमोजणीतून मतदारांनी आपल्या मतांचे दान कोणाच्या पदरी टाकले, हे कळणार आहे.
अब्दीमंडीत ८३ टक्के मतदान
अब्दीमंडी,माळीवाडा येथील निवडणुकीत किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. येथे चार बूथ होते. २०५७ मतदानापैकी १७०९ मतदारांनी आपला हक्क बजावला. अब्दीमंडीत ८३ टक्के मतदान झाले. माळीवाडा येथील चार बूथवर २९०५ मतदान होते. त्यापैकी २३८९ मतदारांनी मतदान केले. येथे ८२.२३ टक्के मतदान झाले. क्षेत्रीय अधिकारी म्हणून के.बी. येळीकर यांनी काम पाहिले.
येथेही झाले मतदान
वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत रांजणगाव शेणपुंजी, पंढरपूर, अंबेलोहळ, कासोडा, वडगाव रामपुरी, घाणेगाव, जोगेश्वरी आदी ग्रामपंचायतींमध्ये मतदान पार पडले. तर, वाळूज पोलिस ठाण्यांतर्गत तुर्काबाद, शेंदुरवादा, वाळूज, दहेगाव, नारायणपूर, लांझी, तळपिंप्री, धामोरी, जिकठाण, मांडवा, येसगाव आदी १२ ग्रामपंचायतींमध्ये मतदान पार पडले. तसेच औद्योगिक क्षेत्राला लागून असणाऱ्या, मात्र सातारा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाटोदा, वळदगावसोबतच दौलताबाद पोलिस ठाण्यांतर्गत असणाऱ्या आसेगाव अशा एकूण २२ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी मतदान शांततेत पार पडले.
असे झाले मतदान (टक्केवारीत)
तुर्काबाद ८२
जोगेश्वरी ८१
पंढरपुर ७२
वाळूज ७२
रांजणगाव ६७
सर्वात कमी उत्साह रांजणगावात
मतदानाचा सर्वात कमी उत्साह दिसला तो गर्भश्रीमंत समजल्या जाणाऱ्या रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीमध्ये. दरवेळी येथे ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत मतदान होते. परंतु यंदा कमी म्हणजेच अवघे ६७ टक्के मतदान झाले. दिवसभर मतदार घराबाहेर पडत होते. परंतु मतदान करण्यासाठी पैशांची देवाण-घेवाण झाल्याने टक्केवारी घटल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
हात जोडून विनंती
मतदान करून घेण्यासाठी उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे औरंगाबाद-नगर महामार्गावरील पंढरपूर येथील महामार्गालगतच मतदान केंद्राचे बूथ असल्यामुळे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी दिवसभर छत्र्या घेऊन तर कोणी नखशिखांत भिजून दिवसभर उभे राहून मतदानाला निघालेल्या नागरिकांना आपल्यालाच मतदान करा, अशी हात जोडून विनंती करत होते. त्यामुळे या महामार्गावर दिवसभरात अनेक वेळा वाहतुकीचा प्रश्नही उद््भवला.
बातम्या आणखी आहेत...