आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगला विद्यार्थी घडवण्‍यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्‍वाची - डॉ एन.जे. पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चांगला विद्यार्थी घडवण्‍यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रथम चांगले शिक्षक
घडवावे लागतील, असे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी सांगितले. पवार हे शुक्रवारी डॉ
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात आयोजित करण्‍यात आलेल्या 'उच्‍च शिक्षण: आजची स्थिती व आव्हाने' या विषयावर बोलत होते.


या व्याख्‍यानाप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे अध्‍यक्षस्थानी होते.यावेळी विद्यापीठ व महाविद्यालय विकास परिषदेचे(बीसीयूडी) संचालक डॉ झांबड, कुलसचिव डॉ. धनराज माने, परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, डॉ. एस. टी. सांगळे, डॉ. वाल्मिक सरवदे, दीपक मुळे आदींची उपस्थिती होती. डॉ. पवार म्हणाले, शिक्षकांनी शिकवण्‍याबरोबरच संशोधनालाही महत्त्व दिले पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्‍यांमध्‍ये संशोधनाची आवड निर्माण केली पाहिजे. सद्य:स्थितीबाबत बोलताना पवार यांनी सांगितले, की स्वीडनमध्‍ये 153 लोकसंख्‍ये मागे एक संशोधक, तर भारतात पाचशे लोकसंख्‍येमागे एक संशोधक असे गुणोत्तर आहे. यावेळी कुलगुरू डॉ पांढरीपांडे यांनीही आपले विचार मांडले. कुलसचिव डॉ माने यांनी प्रास्ताविक केले.