आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरला दुष्काळ, राज्याच्या सर्वच धरणांत आता सुकाळ! प्रमुख धरणांतून पाणी सोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालखेड धरणातील विसर्गाचे दृश्य. - Divya Marathi
पालखेड धरणातील विसर्गाचे दृश्य.
औरंगाबाद - गेली तीन वर्षे पाण्याचा दुष्काळ सोसत असलेल्या मराठवाड्यासह महाराष्ट्रावर वरूणराजाने मुक्तहस्ते भरपूर पावसाची उधळण केल्याने राज्यातील सर्वच प्रमुख धरणे पाणीसाठ्याने मालामाल झाली आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात ७३६ मिलिमीटर पाऊस झाल्याने राज्यातील कोयना धरणासह सर्वच प्रमुख धरणांतून पाणी सोडले जात आहे. आजमितीला राज्यातील धरणांतील सरासरी पाणीसाठा ५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्या राज्यात सरला दुष्काळ, आता पाण्याचा सुकाळ’ अशी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, कोल्हापूरसह राज्याच्या अनेक भागात मध्यम ते मूसळधार पाऊस सुरू असल्याने सामान्य जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे तळ गाठलेली धरणे आता भरण्याच्या स्थितीत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या माहितीनुसार औरंगाबाद, लातूर, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली यासह राज्यातील २६ जिल्ह्यांत यंदा वार्षिक सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाला आहे. तर धुळे सोलापूर, कोल्हापूर, बीड, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस झाला आहे.
पुढे वाचा...
>रस्त्यावरच झाले दशक्रीया विधी
>नाशिक | दुतोंड्या मारुती पाण्याखाली
>सोलापूर | उजनी जिवंत साठ्यात
>औरंगाबाद | गोदाकाठी अतिदक्षतेचा इशारा
>कोल्हापूर | पंचगंगेने ओलांडली धोका पातळी
>अंदाज | २४ तासांत मुसळधार शक्य
>धरणांतील सरासरी पाणीसाठा असा