आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समन्यायी निधीसाठी राज्यपालांना भेटणार - गोपीनाथ मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - समन्यायी निधीवाटपात मराठवाडा, विदर्भ व खान्देशावर अन्याय होत असून, याबाबत भाजपचे शिष्टमंडळ दोन दिवसांत राज्यपालांना भेटणार आहे, अशी माहिती भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. सध्याच्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकर्‍यांना देण्याची मागणीही मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केली. निधीबाबत विवरण पत्र देत नसल्यावरून राज्यपालांनी सरकारकडे पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. त्याच आधारे त्यांना भेटणार असल्याचे मुंडे म्हणाले.

टोलमुक्तीचा फॉम्र्युला : सरकार सांगत असलेला 1 लाख 10 हजार कोटींचा टोलचा खर्च पुढच्या 20 वर्षांचा आहे. नवीन गाडी खरेदीवर कर लावला तर टोलची रक्कम घेता येऊ शकते. अशा करापोटी सरकारला गतवर्षी 22, 500 कोटी मिळाले. तीन वर्षाचे सरासरी उत्पन्न 20 हजार कोटी आहे. हा कर दीडपट केला तर सर्व पैसे एकावेळी कंत्राटदारांना देऊन टोलमुक्ती होऊ शकते. भाजपने तज्ज्ञांची समिती नेमली आहे. त्यावर अभ्यास सुरू आहे. टोलमुक्ती हा महायुतीचा निर्णय असल्याचे मुंडे म्हणाले.