आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde News In Marathi, Beed Lok Sabha Constituncy, BJP, Divya Marathi

गोपीनाथ मुंडेंच्या मदतीसाठी बीड जिल्हा मित्रमंडळ सरसावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बीडमधील औरंगाबादेत राहणारे बीड मित्रमंडळाचे चार हजार सदस्य महायुतीचे उमेदवार खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही जण सुटी घेऊन प्रचारासाठी बीडला रवाना झाले आहेत.
औरंगाबादेत बीडमधून आलेला नोकरदारवर्ग विद्यार्थी, कामगार, मजूर यांची मोठी संख्या आहे.

बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी बीड जिल्हा मित्रमंडळाची स्थापना पंधरा वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. सध्या मुंडेंना मतदान करण्यासाठी मित्रमंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. मुंडेंचा पराभव करण्यासाठी शरद पवारांपासून ते अनेक दिग्गज नेते बीडमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी बीड जिल्हा मित्रमंडळाने शहरात मेळावा घेतला आणि आपली ताकद मुंडेंच्या पाठीशी उभी करा, असे आवाहन कार्याध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केले.


माजी महापौर डॉ. भागवत कराड यांनी सांगितले, बीड मित्रमंडळ 15 वर्षांपासून कार्यरत आहे. मित्र मंडळाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवल्या जातात. आता मित्रमंडळाचे सदस्य मुंडेंसाठी कामाला लागले आहेत.