आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडेंना श्रद्धांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर संघाच्या एन-11 हडको येथील कार्यालयात श्रद्धांजली सभा घेण्यात आली. या वेळी भोई समाजाचे सरचिटणीस राज वानखेडे यांनी मुंडे यांची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 28 मे 2001 रोजी नवी दिल्ली येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. विमुक्त जाती-भटक्या जमातींना आरक्षण मिळवून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. भोई समाजाचे नेते कै. के. बी. वानखेडे (फुलंब्रीकर) तसेच बंजारा संघाचे हरिभाऊ राठोड व धनगर समाजातील नेत्यांनी आपापल्या समाजाच्या व्यथा मांडून त्यांच्या नेतृत्वाखाली शासनावर दबाव आणण्याची विनंती केली होती. आता मुंडे यांना ग्रामविकास खाते मिळाल्याने भोई समाजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. पण मुंडे यांच्या निधनाने समाज पुन्हा निराश झाला आहे, असे ते म्हणाले. या वेळी चंद्रकला वानखेडे, रामदास बावणे, चंद्रकांत दुव्वा, शंकर श्रीनाथ, नारायण वाल्डे, संजय मोरे, बाळू बनसोडे, बाबासाहेब ढोले आदींची उपस्थिती होती.

दलित-ओबीसी महासंघ
गोपीनाथ मुंडे दीनदलितांचे, गोरगरिबांचे आणि ओबीसींचे कैवारी होते. मराठवाड्याच्या विकासात, नामांतराच्या लढ्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला. त्यांच्या अकाली निधनाने मराठवाड्याची मोठी हानी झाली, असे विचार विविध पदाधिका-यांनी मांडले. या वेळी दलित-ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष नारायण साळवे, प्रदेश सरचिटणीस नंदकिशोर वाघ, मध्य विधानसभा अध्यक्ष समशेर पटेल, शहराध्यक्ष जुबेर देशमुख, सुगत हजारे, गुलाब वाळेकर, सुभाष इंगळे, अनिस खान आदींची उपस्थिती होती.

भारतीय क्रांती सेना

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे मराठवाड्याचा आधार खचला आहे, अशा शब्दांत संघटनेचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम झलवार यांनी श्रद्धांजली वाहिली. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी सकारात्मक राजकारण केले, असे ते म्हणाले. सामान्य माणसाचे, शेतकरी-कष्टक-यांचे प्रश्न मार्गी लावतील, असा विश्वास जनतेत होता. मात्र, त्यांच्या अकाली जाण्याने जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

रूपांतरण एकात्मिक युवा प्रतिष्ठान
प्रतिष्ठानच्या वतीने सिडको, एन-4 येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन वैद्य आणि सचिव आशिष सुरडकर यांच्या हस्ते मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रतिष्ठानचे सदस्य पंकज पाडळकर, प्रल्हाद देशपांडे, शशिकांत देशमुख, राम कुलकर्णी, स्वप्निल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंडे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांसाठी स्कॉलशिप सुरू करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे शहराध्यक्ष कृष्णा डिडोरे यंनी केली आहे.
नागरिक हास्ययोग शिक्षण प्रशिक्षण संघ
मराठवाड्यातील नवनिर्वाचित खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे संघाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी गटप्रमुख वसंत बाबर, अनिल देवकर, चतरसिंग राजपूत, बी. बी. राजगुरू, गोपाल पाठक, दिगंबर जगताप, कमलाकर जोशी, राम अष्टेकर, रमेश शैव, शंकर नवले आदींची उपस्थिती होती- जयाजी सूर्यवंशी
गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने साखर उद्योगाचा जादूगार गेला, अशी भावना जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. ग्रामीण विकासाचा ध्यास असलेला नेता होता. शेतक-याप्रति अत्यंत जिव्हाळा बाळगणारा, साखर कारखाना आणि ऊसतोड कामगार यांच्यातील दुवा हरपला आहे, असे ते म्हणाले.