आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- साखर सहसंचालक कार्यालयातील विशेष लेखा परीक्षक सुधाकर अभिमन्यू मुंढे (४७) यांनी शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या सह्याद्री हिल्समधील घरी कानशिलात गोळी झाडून शुक्रवारी आत्महत्या केली. पत्नी पाणी भरण्यासाठी गॅलरीत गेली असताना मुंढे हॉलमध्ये होते. त्याच वेळी त्यांनी स्वत:वर ही गोळी झाडली. ते मूळ बीड जिल्ह्यातील वडवणी येथील रहिवासी आहेत. रिव्हॉल्व्हरमधून निघालेली गोळी डोक्याच्या आरपार जाऊन दहा फूट दूर असलेल्या भिंतीला लागली. गोळी झाडल्याचा आवाज आल्याने पत्नी, मुलगी व इतर कुटुंबीय हॉलमध्ये आले. तेव्हा मुंढे रक्ताच्या थारोळ्यात खुर्चीवर पडले होते. दरम्यान, माहिती मिळताच पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदिराज, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्वर थोरात व पथक घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येत वापरण्यात आलेली रिव्हॉल्व्हर, गोळी पोलिसांनी जप्त केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.