आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी चणाडाळ ७८ रु. किलो! दिवाळीच्या चार दिवस आधी शासनाने दर जाहीर केल्याने संभ्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हरभराडाळ अखेर ७८ रुपये किलोने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २४ ऑक्टोबरला अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीने याबाबतचा जीआर जारी करण्यात आला अाहे. औरंगाबादमध्ये पुरवठा विभागाकडून शहरात १७ विक्री केंद्रांमधून हरभरा डाळ ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, डाळ उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेळ खाणारी असल्याने दिवाळीपूर्वी डाळ नागरिकांपर्यंत पोहोचणार काय, यावर प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, डाळ प्राप्त होताच विक्रीची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कदम यांनी दिली.
शहरातील नागरिकांनी दिवाळी सणाची खरेदी सुरू केली आहे. हरभरा डाळ १३० ते १४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. ही कृत्रिम टंचाई मोडित काढण्यासाठी शासनाने रास्त दरात डाळ देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाने चार दिवसांपूर्वीच डाळ विक्रीसाठी १७ केंद्रांची निवडही केली. मात्र शासनाकडून दर निश्चित झाल्याने विक्री प्रक्रिया थांबली होती.

दिवाळीपूर्वी डाळ शिजणार का?
२४ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार शासनामार्फत केंद्र शासनाकडून ७०० मे. टन हरभरा ५० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करण्यात येईल. त्यानंतर प्रक्रिया केलेली डाळ मुंबई ठाणे तसेच पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती औरंगाबाद या शहरातील खुल्या बाजारामध्ये वितरित करण्यात येईल. भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून उचल, भरडई करून प्राप्त झालेली डाळीचे किलोची पाकिटे शासनाने निवडलेली दुकाने, केंद्रांवर पोहोचवली जाईल. या केंद्रांमधून प्रत्येकी एक किलो डाळ उपलब्ध करून दिली जाईल. मात्र ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन दिवाळीपूर्वी डाळ मिळणार का याची ग्राहकांना उत्सुकता आहे.

बातम्या आणखी आहेत...