आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Employees,latest News In Divya Marathi

शासकीय कर्मचा-यांचे मतदान 14 ऑक्टोबरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शासकीय कर्मचा-यांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक विभागातर्फे मतदान साहित्य वाटप केंद्रावरच नऊ मतदारसंघांचे बॉक्स ठेवण्यात येणार आहेत.
त्यामुळे 14 ऑक्टोबरला मतदान करून कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येईल. जिल्ह्यात 20 हजार शासकीय कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असून 3 हजार 900 सर्व्हिस व्होटर आहेत. निवडणुकीच्या घाईत कर्मचाऱ्यांना मतदान करणे शक्य होत नाही. त्यामुळे आदल्या दिवशीच त्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मतदान प्रक्रियेच्या वेळी नऊ मतदारसंघांतून तीन आदर्श मतदान केंद्रांची घोषणा करण्यात येणार आहे. त्यात खुर्ची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मतदारांसाठी उभे राहण्याची सावलीची व्यवस्था याचा विचार करण्यात येणार आहे. या वेळी पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह, पोलिस अधीक्षक अनिल कुंभारे, निरीक्षक उपेंद्र बोरा, बी. रामानुजल्लू, मनोजकुमार, ए. के. अय्यप्पा यांची उपस्थिती होती.

80 मतदान केंद्रे वाढली
मतदारांची वाढलेली आकडेवारी लक्षात घेऊन 80 केंद्रांची वाढ करण्यात आली आहे. कर्मचा-यांच्या संख्येतही वाढ केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी २ हजार 630 मतदान केंद्रे होती. या वेळी 2 हजार 747 मतदान केंद्रे असणार आहेत. नवीन 184 मतदान केंद्रे प्रस्तावित आहेत.