आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन निर्णयाच्या "ललित कलां'विरोधात लढा, घोषणाबाजीने दणाणला क्रांती चौक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- निधीचाप्रश्न पुढे करत कला शिक्षकांऐवजी अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेत शासनाने कलाप्रकार संपुष्टात आणण्याचा घाट घातला आहे. याविरोधात महाराष्ट्र राज्य ललित कला शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत ऑक्टोबरचा शासन निर्णय मागे घेण्याची मागणी केली.
गारोडी, गोंधळी आणि चेटकिणीचे रूप घेत विविध कलाप्रकार सादर करत शिक्षकांनी "सरकारी अत्याचार करी कलाकाराला लाचार' अशी घोषणाबाजीही केली. क्रांती चौकात झालेल्या या आंदोलनात सर्व कलाप्रकाराचे शिक्षक सहभागी झाले. निवेदनात संघटनेने म्हटले आहे, शाळेय विद्यार्थ्यांना आनंददायी आरोग्यवर्धित शिक्षण मिळावे, यासाठी शाळांमध्ये कला क्रीडा शिक्षणास विशेष प्राधान्य देण्याकरिता शालेय शिक्षणमंत्री जोर देत आहेत. दुसरीकडे आरटीई कायद्याचा सोयीचा अर्थ काढून पैसे वाचवण्यासाठी हे विषय लोकसहभागातून चालवण्याचा घाटही शासनाने घातला आहे.
नियमित कला शिक्षकांऐवजी मानधन तत्त्वावर अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्याचा आदेश ऑक्टोबर रोजी शासनाने काढला. शंभर विद्यार्थ्यांसाठी अंशकालीन कला क्रीडा कार्यानुभव अतिथी शिक्षक, निदेशक असावा. हे अतिथी शिक्षक विनावेतन काम करण्यास तयार असावेत. अथवा ५० रुपये प्रतितासिका किंवा मासिक अडीच हजार यापैकी कमी असेल ते या अतिथी शिक्षकांना देण्यात यावे त्यांच्याकडून कला क्रीडा विषयाचे अध्यापन करून घ्यावे, असे शासनास अपेक्षित आहे.
मात्र, असे निर्णय घेतले तर सक्षम शिक्षक कसे मिळणार ? असा सवालही संघटनेने केला आहे. या आंदोलनात प्रल्हाद शिंदे, राजेश निंबेकर, मधुकर पाटील, विवेक महाजन, संजय जाधव, चंद्रकांत लिंबेकर, नामदेव सोनवणे,अंकुश अंभोरे, समाधान तायडे, रवींद्र खोडाळ,अमित रोकडे, नवाब शहा, बाळासाहेब कोकरे, बाळासाहेब ओमने आदी सहभागी झाले होते.

कलाविषय अनिवार्य करा
सरलप्रणालीत कला शिक्षकांच्या सर्व अर्हता दर्शवव्यात, संचमान्यतेत स्वतंत्र कलाशिक्षक नमूद करावा, संचमान्यता सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करावी, सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांत स्वतंत्र पूर्णवेळ कला-क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करावी. तसेच दहावी बारावी बोर्ड परीक्षेसाठी कलाविषय अनिवार्य करून क्रमिक पुस्तके काढावीत आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
शासनाच्या धोरणाविरोधात मंगळवारी कला शिक्षकांनी क्रांती चौकात आंदोलन केले.