आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संलग्नीकरण करणा-या ग्राहकांची लॉटरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घरगुतीगॅस सिलिंडरसाठी संलग्नीकरण केलेल्या ग्राहकांच्या खात्यावर शासनाकडून थेट अनुदान जमा करण्यात येत आहे. त्यातही अगोदरच ५६८ रुपये जमा होत असल्याने ग्राहकांना अनुदान आणि आगाऊ अनुदानापोटी ८६१ रुपये मिळत असल्याने मोठा फायदा होत असल्याचे समोर आले.
शहरात संलग्नीकरण करण्यास मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, ज्या ग्राहकांनी पूर्वीच गॅस कनेक्शन बँकेशी संलग्न केले आहे, अशा ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. संलग्नीकरण केलेल्या ग्राहकांनी सिलिंडर बुक केल्यानंतर त्यांच्या खात्यावर तत्काळ ५६८ रुपये जमा होत आहेत. ही रक्कम शासन अागाऊ अनुदान म्हणून खात्यावर जमा करते. ग्राहकांनी ७६५ रुपये भरून सिलिंडर घेतल्यानंतर पुन्हा त्यांच्या खात्यावर अनुदानाचे २९३ रुपये जमा करण्यात येत आहेत. म्हणजे ग्राहकांना ८६१ रुपये मिळत आहेत. विनाअनुदानित िसलिंडरची रक्कम ७६५ रुपये आहे.सिलिंडरच्या रकमेपेक्षा ९६ रुपये जास्त ग्राहकांच्या खात्यावर जमा होत आहेत.
ग्राहकांची स्थिती
शहरातएकूण लाख ७० हजार ग्राहक आहेत. त्यापैकी दोन लाख ग्राहकांनी संलग्नीकरण केले आहे. लाख ७० हजार ग्राहक संलग्नीकरणाचे बाकी असून त्यांना हा फायदा होत नाही. त्यांना केवळ ४५२ रुपये भरून सिलिंडर मिळत आहे.
हा जास्तीचा फायदा
ज्या ग्राहकांनी संलग्नीकरण केले, त्यांनाच हा जास्तीचा लाभ होत आहे. ही रक्कम ग्राहकांना एकदाच मिळणार आहे. नंतर ग्राहकांनी अनुदानाचे पैसे भरायचे आहे. मंगेशअास्वार, संचालक,मंगेश गॅस एजन्सी.