आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय तंत्रनिकेतनची वेबसाइट हॅक, दोन दिवसांपूर्वीच लागला निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शासकीय तंत्रनिकेतनची वेबसाइट शुक्रवारी दुपारी एक ते पाचच्या दरम्यान हॅक करण्यात आली होती. त्यावर काश्मीरमध्ये पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या तरुणांच्या टोळक्याचे छायाचित्र टाकण्यात आले. सोबत वेबसाइट हॅक केल्याची इमेजही झळकली. दोन दिवसांपूर्वीच तंत्रनिकेतनचा निकाल लागला असून तो संकेतस्थळावर टाकण्यात आला होता.
 
 
अनेक विद्यार्थी निकाल पाहत असताना हा प्रकार घडला. तंत्रनिकेतनच्या प्राध्यापकांनी त्याची माहिती पोलिस आयुक्तालयातील सायबर विभागाला दिली. वेदांतनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती. याप्रकरणी अभाविपचे कार्यकर्ते सुजय चिंचवणकर, ईश्वर अष्टके, विवेक पवार अाणि वीरभूषण पाटील यांनी पाेलिसांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. 
बातम्या आणखी आहेत...