आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉलमध्येही शिजेना सरकारी तूरडाळ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्य सरकारने महापालिकांच्या क्षेत्रात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मॉलमध्ये ९५ रुपयांत तूरदाळ विक्रीचा निर्णय घेतला. सप्टेंबरपासून शहरातील मॉलमध्ये डाळीची विक्री करण्याचे ठरवले होते. मात्र बाजारात भाव गडगडल्याने माॅल चालकानी तूरडाळ खरेदीकडे पाठ फिरवली. दरवाढीमुळे तूरडाळ सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून बाद होत चालली होती. उन्हाळ्यात तर डाळीचा भाव १६० रुपयांपर्यंत गेला होता. त्यामुळे राज्य सरकारने रेशन दुकानावर तूरडाळ देण्याच्या निर्णय घेतला.
मात्र प्रत्यक्षात रेशन दुकानापर्यंत डाळ पोहोचेपर्यंत दर घटल्याने डाळीला उठाव मिळाला नाही. औरंगाबादसाठी २१७३ क्विंटल तूरडाळ उपलब्ध झाली आहे. बीपीएल अंत्योदय कार्डधारकांना रेशन दुकानदारांमार्फत ती देण्यात येणार आहे. मात्र आतापर्यंत रेशन दुकानदारांनी केवळ ९८० क्विंटल डाळ उचलली. या डाळीचा भाव १०३ रुपये किलो आहे. ग्रामीण बाजारांत ती ८० ते ९० रुपये किलो दराने मिळू लागल्याने रेशनवरील डाळीला प्रतिसाद नसल्याची माहिती अन्न वितरण अधिकारी छाया पवार यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...