आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Scheme Issue At Aurangabad, Divya Marathi

भारत निर्माणच्या 51 योजना अधांतरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ग्रामीण भागात पाणीपुरवठा होण्यासाठी 2006 मध्ये भारत निर्माण योजनेअंतर्गत 51 कामे हाती घेण्यात आली होती. मात्र, अद्याप या योजना पूर्ण झाल्या नाहीत. योजना पूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामस्वच्छता व पाणीपुरवठा समितीकडे होती. परंतु, समितीतील सदस्य बदलल्यामुळे ही कामे रखडली आहेत.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने भारत निर्माण योजना हाती घेण्यात आल्या होत्या. या योजनांसाठी 20 ते 51 लाख रुपयांपर्यंत खर्च होणार होता. पहिल्या वर्षात योजनांची प्राथमिक कामे सुरू करण्यात आली होती. सर्व योजनांना एकूण तीन कोटी 50 लाख रुपयांपर्यंत निधी देण्यात आला होता.

अपूर्ण राहण्याची कारणे
योजनेसाठी गठित समितीतील सदस्य बदलले. पहिल्या समितीने कामे न करता जास्तीचा निधी घेतल्याने नवीन समितीकडून ही कामे करण्यास नकार देण्यात आला. तसेच दरवर्षी योजनेच्या कामांचे अंदाजपत्रक वाढत गेले. नवीन अंदाजपत्रकही समितीने सादर केले नाही. त्यामुळे योजना पूर्ण झाल्या नाहीत. काही योजनांत मोठय़ा प्रमाणात समितीने गैरव्यवहार केल्याने योजना मार्गी लागण्यास अडचणी येत आहेत.

अपूर्ण राहिलेल्या तालुकानिहाय योजना
12वैजापूर
10औरंगाबाद
06फुलंब्री
04कन्नड
01खुलताबाद
01सिल्लोड
18पैठण

योजना अनिश्चित
या योजना 2006 पासून प्रलंबित आहेत. योजना पूर्ण करण्याची जबाबदारी समित्यांची होती. मात्र, त्यांनी ती पूर्ण केली नाही. काही योजनांना निधीही दिला आहे. त्या कधी पूर्ण होतील ते निश्चित नाही. एस. गायकवाड, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा