आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कलाचे विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात, टीसीसाठी सामूहिकरीत्या 300विद्यार्थ्यांनी केले अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : शासकीय कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला. मात्र विद्यार्थ्यांनी हा अहवाल अमान्य असल्याचे सांगत आंदोलन सुरू केले आहे. टीसी परत घेण्यासाठी सामूहिकरीत्या ३०० विद्यार्थ्यांनी बुधवारी अर्ज केला. यामुळे अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. 

औरंगाबाद येथील कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षकांअभावी नुकसान होत आहे. 
उपयोजित कला आणि चित्रकला या विभागांना शिक्षकच नाहीत. कंत्राटी शिक्षकांवरच कॉलेजचा कारभार सुरू आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी ऑक्टोबरमध्ये आंदोलन केले होते.
 
आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात या मागणीसह काही शिक्षकांच्या शिकवण्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. संचालकांनी भेट दिल्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी डॉ. मनीषा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. 
 
समितीने कॉलेजला भेट देऊन प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इन कॅमेरा चौकशीनंतर समितीने आपला अहवाल कला संचालनालयाला सादर केला. त्यानंतर मंगळवारी कॉलेजने विद्यार्थ्यांसमोर हा अहवाल ठेवला. हा अहवाल अमान्य असल्याचे सांगत त्यात ज्या शिक्षकांवर आक्षेप घेतला त्यांना प्रशासनाने पाठीशी घातले असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
 
विद्यार्थ्यांनी आज पुन्हा महाविद्यालयात आंदोलन सुरू केले. त्यात तीनशे विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या टीसी परत द्यावी, अशी मागणी अर्जाद्वारे अधिष्ठातांकडे केली आहे. विद्यार्थ्यांच्या या पवित्र्याची माहिती कला संचालकांना देण्यात आली आहे. 
 
विद्यार्थ्यांच्या भावना वरिष्ठांना कळवू 
- समंजस्याने समस्यादूर व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी अहवालानंतर आलेले पत्र मान्य नसल्याचे सांगत प्रातिनिधिक स्वरूपात टीसीसाठी अर्ज केले. परंतु त्यातून मार्ग काढला जाईल. त्यांच्या भावना वरिष्ठांना कळवल्या आहेत. विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष देत अभ्यास करावा, असे आमचे मत आहे. 
भरत गढरी, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद.