आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सव, स.भु.च्‍या शताब्दीनिमित्‍त तीन दिवसांचा महोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पद्मविभूषणकै. गोविंदभाई श्रॉफ स्मृती संगीत महोत्सव १९ ते २१ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या महोत्सवाची मुहूर्तमेढ १३ वर्षांपूर्वी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरांनी रोवली गेली. संस्थेचे हे शताब्दी वर्ष असल्याने दोन दिवसांचा महोत्सव तीन दिवस होणार आहे. शुक्रवारी पं. अजय चक्रवर्ती यांचे शास्त्रीय गायन होईल. शनिवारी पहिल्या सत्रात संदीप देशमुख यांचे गायन, तर दुसऱ्या सत्रात उस्ताद सुजात खान यांचे सितारवादन होणार आहे. रविवारी अशोक हांडे यांचा आवाज की दुनिया हा कार्यक्रम होईल. तिन्ही दिवशी सायंकाळी ६.३० वाजता मैफलींना सुरुवात होईल. महोत्सवासाठी ५०० आणि ३०० रुपये देणगीमूल्य आहे. औरंगपुरा येथील जोशी ब्रदर्स, टिळकनगर येथील नाजुका डिपार्टमेंटल स्टोअर, मिल कॉर्नर येथील आशीर्वाद बुक डेपो, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय, एन-१ क्रेझी बाइट येथे पासेस उपलब्ध आहेत