आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार, खडसे यांची औरंगाबादेत घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यातयेत्या सहा महिन्यांत २०६५ स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून त्याबाबतचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. तसेच चारा छावण्या उभारायच्या की चारा डेपो, याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या सर्कलच्या माध्यमातून पाऊस मोजला जातो. आगामी काळात यामध्ये अचूकता यावी यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वच सर्कलवर ही हवामान केंद्रे बसवण्यात येणार असून मराठवाड्यात ४२१ ठिकाणी ही केंद्रे बसवण्यात येणार आहेत. या नव्या केंद्रामुळे १० वेगवेगळ्या पॅरामीटरची हवेतील आर्द्रता, तापमान या सर्वांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे डाटा तयार करण्यासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे.

जलयुक्तशिवारमधील तळ्यामध्ये मत्स्यशेतीचे प्रयोग
राज्यातजलयुक्त शिवारमधून ज्या ठिकाणी तळे तसेच लघु प्रकल्पातला गाळ काढला आणि पाणीसाठा झाला, अशा ठिकाणी मत्स्यशेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी या तळ्यात मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पूरक उद्योग निर्माण व्हावेत यासाठी त्यांना १०० टक्के अनुदानावर मासेविक्रीसाठी गाड्या देण्यात येणार आहेत.

चारा मागवणार
मराठवाड्यात तीन जिल्ह्यांत चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. याबाबत खडसे यांनी सांगितले की, चारा छावण्या उभारायच्या की चारा डेपो याचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही. मागच्या वेळेसचे चारा छावण्यांचे अनुभव चांगले अाले नाहीत. सध्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती चारा आहे याचा आढावा घेण्यात येत आहे. उस्मानाबादमध्ये चारा नसल्यामुळे सोलापूर आणि इतर जिल्ह्यातून चारा मागवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...