आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Graduate People Election Issue At Aurangabad, Divya Marathi

‘पदवीधर’चे उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. मराठवाड्यात यावर्षी 609 मतदान केंद्र राहणार असून गेल्या निवडणुकीपेक्षा 151 मतदानकेंद्रे वाढली आहेत. 3 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून 6 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी विभागीय आयुक्तांनी जाहीर केला आहे. सध्या या निवडणुकीत मतदारांची संख्या 3 लाख 68 हजार 385 इतकी झाली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जवळपास 96 हजार मतदारांची संख्या वाढली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक मतदान केंद्रे : मराठवाड्यात 609 मतदान केंद्रे राहणार आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 458 इतकी होती. मात्र राजकीय पक्षाच्या मागणीनुसार आणि मतदार वाढल्यामुळे मतदान केंद्राची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती जैस्वाल यांनी दिली आहे. ते म्हणाले की मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 174 मतदान केंद्रे असतील. गेल्या निवडणुकीत ही संख्या 126 इतकी होती. जालन्यामध्ये 52, परभणी 55, हिंगोली 27, नांदेड 75, बीड 92, लातूर 76 आणि उस्मानाबादमध्ये 58 मतदान केंद्रे राहणार आहेत.

अशी राहणार निवडणूक प्रक्रिया : या निवडणुकीत 27 मे पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तीन जूनला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख राहणार असून 4 जूनला अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. 6 जूनपर्यत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली असून 20 जूनला निवडणूक होणार आहे. तर 24 जूनला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी चार ठिकाणांची पाहणी विभागीय आयुक्तांनी केली आहे.

नोटाचा निर्णय अजून नाही
या निवडणुकीत सर्वाधिक मतदार हे औरंगाबाद जिल्ह्यातले असून आतापर्यंत 107029 मतदारांची नोंदणी झालेली आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी 11316 मतदारांची नोंदणी झालेली आहे. तर जालन्यामध्ये 24443 परभणीत 31202 नांदेडमध्ये 43338 बीडमध्ये 59740 आणि उस्मानाबादमध्ये 39814 मतदारांची नोंदणी झालेली असून तीन जूनपर्यंत मतदारांना नोंदणी करता येणार आहे. या निवडणुकीत नोटा वापरता येणार की नाही याचा निर्णय अजून झालेला नाही. या निवडणुका बॅल्ेाटपेपरवर होणार आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशीनचा वापर नसल्यामुळे नोटाच्या बाबतीतला निर्णय अजून झालेला नाही.
मतदान केंद्रांची संख्या वाढली