आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळू ज्वारी ७००, गहू ३०० अन् बाजरी २०० रुपयांनी महागली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी शाळू ज्वारीची केवळ चार क्विंटलच आवक झाल्यामुळे तिच्या किमतीत ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. आता एका क्विंटलसाठी २,९११ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच गहू ३००, तर बाजरी २०० रुपयांनी महागली आहे. गहू २२०० ते २३०० आणि बाजरीला १७०० रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळाला. महिन्याभरापासून हंगामी रब्बी पेरणीला सुरुवात झाली आहे. नवीन ज्वारी, गहू बाजारात येण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागेल.
शेतकरी खरिपात कापूस, सोयाबीन, मका, रब्बीत मका हरभरा याच पिकांना प्राधान्य देत आहेत. परिणामी गत १५ वर्षांत कपाशीचे क्षेत्र ५३ टक्क्यांनी तर सोयाबीनच्या क्षेत्रात ५३.१ टक्के, रब्बी मका क्षेत्रात ८३.१ टक्के, हरभरा १६.८ टक्क्यांनी वाढला आहे. हवामानातील अनपेक्षित बदलामुळे सिंचनाच्या अभावामुळे गहू ४७ टक्के, ज्वारी २५, बाजरीचे ७३ टक्क्यांनी पेरणी क्षेत्र कमी झाले आहे. म्हणजेच उत्पादनात विक्रमी घट झाली असून त्याचे थेट परिणाम बाजारपेठेवर होत आहे.

शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी... : जेव्हाआवक कमी असते तेव्हा भाव वाढवला जातो. दर्जेदार गुणवत्तापूर्ण शेतमालालाच विक्रमी भाव देऊन प्रचाराच्या माध्यमातून प्रपोगंडा केला जातो. दुसऱ्या दिवशी मोठ्या आशेने शेतकरी माल विक्रीसाठी माल बाजारात आणतात; पण कालपासून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होत आहे. ज्वारीला प्रति क्विंटल २९११ रुपये भाव मिळाला. शुक्रवारी आवक १४ क्विंटलपेक्षा आवक झाली होती, तर गव्हाच्या दरात प्रति क्विंटल १०० रुपयांनी वाढ होऊन २४०० रुपयांवर पोहोचले होते. हरभरा हजार रुपये दराने विक्री झाला. शुक्रवारी हजार रुपयाने घसरला आहे. आवक जास्त मागणीही तेवढीच असल्याने ठोक बाजारात १७ ते १७.५० किरकोळ बाजारात १८ रुपयापर्यंत चांगला भाव मिळत आहे. ठोक बाजारात सर्वच अन्नधान्याचे भाव वाढल्याने किरकोळ बाजारात ज्वारी २५ ते ३० रुपये, गहू २४ ते ३० रुपये, बाजरी १५ ते १८ किलो दराने विक्री होत आहे.
बातम्या आणखी आहेत...