आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ई-पॉस मशीनमुळे 7 महिन्यांत 7626 मेट्रिक टन धान्य बचत; लाभार्थी झाले कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यातील १८०१ पैकी १७९६ रेशन दुकानांवर ई-पॉस मशीन आहे. एप्रिल ते ऑक्टोबरअखेरपर्यंत अंत्योदय योजनेत ७६२६ आणि शेतकऱ्यांसाठीच्या प्राधान्य योजनेत ५९९५ मेट्रिक टन धान्याची बचत झाली आहे. शिवाय स्थलांतरित, मृत, दुबार नोंदणी असलेले १३३७४ लाभार्थी कमी झाले आहेत. 

 

> १७९६रेशन दुकानांवर सुरू झाले औरंगाबाद जिल्ह्यात ई-पॉस मशीन

> जिल्ह्यातील सव्वा तीन लाख लोकांनी केले ई पॉसने केले व्यवहार

 

ई-पॉस व्यवहारांत सात्याने वाढ
औरंगाबाद जिल्ह्यात जूनपासून या मशीनचा वापर सुरू झाला. त्यात रेशनकार्डधारकांचा नंबर व आधार क्रमांक जोडला आहे. जुलैत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून एक लाख ६६ हजार ०८६, ऑगस्टमध्ये २ लाख ८७ हजार ६०२, सप्टेंबरमध्ये ३ लाख ८ हजार १५४, ऑक्टोबरमध्ये ३ लाख २५ हजार ५४२ लोकांनी धान्य खरेदी केले. 

 

धान्याची बचत
जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांनी सांगितले की, एप्रिल ते नोव्हेंबरअखेर अंत्योदय प्राधान्य अंतर्गत प्राधान्याने ४५६८ मेट्रिक टन गहू आणि ३०५८ क्विंटल तांदळाची बचत झाली. प्रत्येक दुकानात काटेकोरपणे ई-पॉसचा वापर झाल्यास आणखी मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.

 

डाटा एंट्रीमध्ये दोष  
आधार लिंकिंग शंभर टक्के नाही, रेशन दुकानांवरील अर्धवट नोंदी, बोटांचे ठसे न जुळणे, नाव नोंदणीतील व्याकरणाच्या चुका यामुळे ई- पॉस वापराची यंत्रणा अजून शंभर टक्के यशस्वी झालेली नाही, असे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी सांगितले.

 

आधार नाही
आधार कार्डाची सक्ती करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने आता रेशन दुकानांवर आधार नसले तरी धान्य दिले जाते. सध्या ३० टक्के लोकांचे आधार कार्ड लिंक झालेले नाही. ते झाल्यास बोगस लाभार्थींची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.

 

पुढील स्‍लाईडवर पाहा, जिल्हानिहाय ई-पॉस मशीनचे प्रमाण असे... 

 

बातम्या आणखी आहेत...