आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरभरा, मक्याच्या क्षेत्रात वाढ; गहू, ज्वारी पिकणार जेमतेम; परतीच्या पावसाने संजीवनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- परतीच्या पावसाने रब्बी पेरणीला संजीवनी मिळाली. मराठवाड्यात ७५.२८ टक्के पेरणी पूर्ण झाली असून हरभरा १५२.६५ टक्के आणि मक्याच्या १३४.७४ टक्के क्षेत्रात विक्रमी वाढ झाली आहे. पाण्याचा अभाव असल्याने ज्वारीची केवळ ५९.३२ टक्के व गव्हाच्या सरासरी क्षेत्रापैकी ४४.३७ टक्के पेरणी झाली आहे. डिसेंबरपर्यंत गव्हाच्या क्षेत्रात वाढ होण्यास वाव आहे. एकूण  रब्बी  पीक  क्षेत्राचा  विचार करता  हरभरा,  मक्याच्या  उत्पादनात वाढ होईल तर गहू, ज्वारीचे उत्पादन जेमतेम होणार असल्याने त्याचा थेट बाजारपेठेवर परिणाम होणार हे निश्चित. 

  
गतवर्षी मान्सूनने दगा दिला. मान्सूनच्या प्रत्येक महिन्यात पावसाचे मोठे खंड पडले. जुलै ते ऑगस्ट दरम्यान चार ते पाच आठवड्यांचा खंड पडला होता. खरीप पिकांचे नुकसान झाले.  सप्टेंबर अखेर व ऑक्टोबरमध्ये परतीचा जोरदार पाऊस पडला. मात्र, स्थलनिहाय पडणाऱ्या पर्जन्यमानात कमालीचा फरक राहिला आहे. जेथे पाऊस चांगला व खरिपाची रान खाली राहिली व झाली तेथे रब्बी पेरणी १०० टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. यात केवळ लातूर जिल्ह्याचा समावेश होतो, तर उर्वरित जिल्ह्यात परतीच्या पावसाचे प्रमाण कमीच राहिले. त्याचा थेट परिणाम रब्बी पेरणीवर झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १६.५१ टक्के पर्जन्यमान कमी झाले. रब्बी पेरणी केवळ ४८.१ टक्का म्हणजे आजवर सर्वात कमी पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांत औरंगाबादच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. १५ डिसेंबर पर्यंत त्यात 

 

जिल्हानिहाय  पर्जन्यमान व रब्बीच्या पेरणी क्षेत्राचा आलेख खालीलप्रमाणे   

औरंगाबाद कृषी विभाग    

>औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५६३.९३ टक्केच म्हणजे ८३.४९ टक्केच पर्जन्यमान झाले आहे. त्याचा थेट परिणाम रब्बी पेरणीवर झाला असून १ लाख ८९ हजार २२८ हेक्टरपैकी केवळ ९० हजार ८५७ हेक्टर म्हणजेच ४८.०१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. त्यात ज्वारी ४१.९२, गहू ४०.२२, मका १३.४७, हरभरा ७०.८६, करडई २६.५५ सूर्यफूल २.१४ टक्के समावेश आहे.   
> जालना जिल्ह्यात ९८.२१ टक्के पर्जन्यमान झाले. १ लाख ५२ हजार ६०० हेक्टरपैकी १ लाख ३० हजार ३६२ हेक्टरवर प्रत्यक्ष ८५.४३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ज्वारी ७१.९५, गहू ९०.६०, मका ११७.८२, हरभरा १५६.२६, करडई ३४.६४ टक्के समावेश आहे.   
> बीडमध्ये १०५.४७ टक्के पाऊस पडला. ३ लाख १० हजार २२७ सरासरी हेक्टरपैकी २ लाख ६१ हजार ६८८ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी(८४.३५ टक्के)पूर्ण झाली. त्यात ज्वारी ६८.३८, गहू ५०.७९, मका ११३.४८, हरभरा १८६.१०, करडई २८.६४, जवस ९.४९, सूर्यफूल १.५६ टक्क्यावर आहे.

 

बाजारपेठेवर होईल परिणाम   
मराठवाड्यात एकूण १८ लाख ६ हजार ९८० हेक्टरपैकी १३ लाख ६० हजार ३४४ हेक्टर म्हणजेच ७५.२८ टक्के पेरणी पूर्ण झाली असून यंदा ज्वारी, गव्हाचे क्षेत्र जेमतेम राहणार असून उत्पादन कमी होणार असल्याने त्याचा बाजारपेठेवर थेट परिणाम होईल. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होऊन भाव वाढ होतील,  तर हरभरा, मक्याच्या उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होईल. तीळ, करडई, जवस, सूर्यफुलाचे क्षेत्र अत्यल्प आहे. बाजारात त्याचे भाव गगनाला भिडले आहेत.   

 

लातूर कृषी विभागात   

> लातूर ९५.६९ टक्के पाऊस पडला. १ लाख ७८ हजार ३१४ हेक्टरपैकी २ लाख ८ हजार ४६१ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी म्हणजे ११६.९१ टक्के पूर्ण झाली. ज्वारी ७५.९८, गहू ३०.१३, मका १५१.५६, हरभरा २१८.६४, करडई ४३.८४, जवस २२.७१, सूर्यफूल २.७४ टक्के. म्हणजेच  सरासरीपेक्षा १६.९१ टक्के पेरणी क्षेत्रात वाढ.   
> उस्मानाबाद १०९.२२ टक्के पाऊस पडला आहे. ४ लाख ९ हजार १९० हेक्टरपैकी २ लाख ९८ हजार ५९९ हेक्टरवर ७२.९७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ज्वारी ५९.९५, गहू ६६.८५, मका २७४.६१, हरभरा १५४.८१, तीळ २४.३६, जवस २६.४५, सूर्यफूल ३६.७६ टक्के.    
> नांदेड ६५.५९ टक्के पर्जन्यमान, १ लाख ३३ हजार ४१४ हेक्टरपैकी १ लाख १३ हजार ४१४ हेक्टर म्हणजे ८५.१४ टक्के पेरणी पूर्ण झाली असून ज्वारी ५९.३९, गहू १८.२१, मका २१९.८५, हरभरा १५४.१३, तीळ १.७२, करडई ३५.६७, सूर्यफूल १०.९३ टक्के.   
> हिंगोली ७२.९० पर्जन्यमान, १ लाख ४५ हजार २७४ हेक्टर पैकी ९१ हजार १४९ हेक्टरवर प्रत्यक्ष रब्बी पेरणी  ६२.७४ टक्के झाली. ज्वारी ४२.९७ , गहू ३७.७२, मका ५०५.२९, हरभरा १२०.४२, करडई ०.६५ टक्के.   

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...