आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळीः ६०२ जागांसाठी १५६८ उमेदवार उतरले शर्यतीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड- औरंगाबाद तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ४ आॅगस्ट रोजी होत असून त्यापैकी पोखरी, गेवराई, कुबेर, गारखेडा आणि वाहेगाव येथील ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. तालुक्यात ११४ ग्रामपंचायती आहेत. ७६ ग्रामपंचायतीं चा कार्यकाळ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये संपत अाहे. राज्य निवडणूक आयोगाने ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याची घोषणा केली. २३ जुलै रोजी उमेदवारी मागे घेेऊन चिन्हांचे वाटप करण्याची प्रक्रिया झाल्याने निवडणुकीतील पहिला टप्पा झाला. ७६ ग्रामपंचायतींमधील ७१७, ५ ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकीच्या ८ अशा एकूण ७२५ जागांसाठी निवडणुका होत आहेत. पोखरी, गेवराई कुबेर, गारखेडा, वाहेगाव चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. भिंदोन प्रभाग -१, शिवगड तांडा प्रभाग - २ व ३, आडगाव माहुली प्रभाग - १ व ३, कृष्णापूरवाडी प्रभाग - ३, सिंदोन प्रभाग - १, शेवगा प्रभाग - ३ व दरकवाडी येथील प्रभाग १ मधील एकूण ११५ जागांच्या (चार ग्रामपंचायती गृहीत धरून) निवडणुका बिनविरोध झाल्या. शेलुद, चारठा, गोलवाडी, बनगाव व जडगाव येथील आठ जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. त्यापैकी जडगावच्या एका जागेची बिनविरोध निवडणूक झाली. आहे. ७१७ जागांसाठी २१६८ उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी ६०० उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र परत घेतले. छाननीनंतर ६०० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले, त्यातील ११५ जागा बिनविरोध झाल्या.

या निवडणुका लक्षवेधी
वरूडकाझी, शेंद्रा कमंगर, गेवराई ब्रुकबाँड, पाटोदा, पिसादेवी, गाढेजळगाव, पंढरपूर, शेंद्राबन, कुंभेफळ, चित्तेपिंपळगाव, करमाड व पिंप्रीराजा येथील निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत.

२७७ मतदान केंद्रे
तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींसाठी (चार बिनविरोध) २७७ मतदान केंद्रे निर्माण केली. निवडणूकीसाठी १२५० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. तर मदतीला २५ झोनल अधिकारी राहणार आहेत. मतदान यंत्राचे २९ जुलै रोजी सीलिंग केले जाणार अाहे. ३ ऑगस्टला मतदान यंत्र केंद्रावर पोहोचतील. ४ ऑगस्ट रोजी मतदान झाल्यानंतर शासकीय कला महाविद्यालयात ६ ऑगस्ट रोजी मतमोजणी पार पडेल. तहसीलदार रमेश मुनलोड, नायब तहसीलदार डी. एम. देशपांडे, शिवानंद बिडवे, आनंद बोबडे व दत्ता िनलावड यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचे काम सुरू आहे.