आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलंब्री आणि सोयगाव नगर पंचायतीसाठी आरक्षण काढण्याचा कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - फुलंब्री आणि सोयगाव नगर पंचायतीसाठी प्रभाग रचना आरक्षण काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २० ऑगस्ट रोजी प्रभागांचे आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली. फुलंब्री आणि सोयगाव येथे पूर्वी ग्रामपंचायती होत्या. पहिल्यांदाच इथे नगर पंचायतीची निवडणूक होणार आहे.
राज्यात ज्या ठिकाणी नवीन नगर पंचायती झाल्या, त्यात फुलंब्री सोयगावचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही नगर पंचायतींमध्ये निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. दोन्ही नगर पंचायतींमध्ये १७ प्रभाग आणि १७ सदस्य राहणार आहेत. फुलंब्रीची लोकसंख्या १६ हजार ६६५ इतकी आहे. या ठिकाणी १७ प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून एक सदस्य निवडला जाणार आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, आणि १० सर्वसाधारण सदस्य असतील, तर महिला सदस्य असणार आहेत. सोयगावची लोकसंख्या हजार ३६० इतकी असून नगर पंचायतीचे १७ प्रभाग १७ सदस्य असणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण सदस्य असतील. या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी एक प्रभाग असून या प्रभागाचे आरक्षण महिलेसाठी सुटले, तर सर्वसाधारण गटातील महिला कमी होईल. या ठिकाणीही महिला सदस्य राहतील. दरम्यान, वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत आणि प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. येथे प्रभाग निश्चित करताना जीपीएस प्रणालीचा आधार घेऊन सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे.

प्रभागांचे आरक्षण सोडतीद्वारे काढण्यासाठी सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. २० ऑगस्टला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागांची सोडत काढण्यात येणार आहे. हरकती दावे स्वीकारण्यासाठी २४ रोजी सूचना प्रसिद्ध केली जाणार असून ३१ ऑगस्टपर्यंत हरकती दावे स्वीकारले जाणार आहेत. चार सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यावर सुनावणी घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत. तर सप्टेंबर रोजी प्रभागांची अंतिम सूचना प्रसिद्ध केली जाणार असल्याचे कटके यांनी सांगितले.