आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुका पुढे ढकलल्याने बदलणार ग्रा.पं.ची समीकरणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - सरपंच उपसरपंच पदांच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींतील राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडणुकीस अजून २४ दिवस शिल्लक असल्याने सहलीवर गेलेल्या सदस्यांना बाहेर राहणे कठीण होत आहे. त्यातील अनेकांना आता घराची ओढ लागली असून ते परतण्याच्या तयारीत आहेत. त्यांना सांभाळता सांभाळता भावी सरपंच, उपसरपंचपदांसाठी इच्छुक असलेल्यांच्या नाकीनऊ येत आहेत. सदस्य मंडळी परतल्यानंतर सर्वच ग्रामपंचायतींमधील राजकारणाची दिशा बदलणार असल्याचे बोलले जात आहे.
वाळूज परिसरातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आॅगस्ट रोजी घेण्यात आल्या. त्यात वाळूजसह रांजणगाव शेणपंुजी, जोगेश्वरी, पाटोदा, वळदगाव, पंढरपूर, घाणेगाव, नारायणपूर, लांझी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ऑगस्ट रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. वाळूज येथील मतमोजणीच्या वेळी मतदान यंत्रामध्ये छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला. शिवाय झालेले मतदान मोजणीनंतर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीत तफावत असल्याचे आढळून आल्याने संशय आणखी वाढला. तेव्हा हा प्रकार तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश झांपले यांच्या िनदर्शनास आणून देत चौकशीची मागणी केली होती. परंतु तक्रार अर्ज मतमोजणीच्या निकालानंतर दाखल झाल्याचे कारण देत निवडणूक निर्णय अधिकारी झांपले यांनी तो फेटाळून लावल्याने पराभूत उमेदवार लता इले, कलाबाई थोरात, ज्योती अविनाश गायकवाड, अमोल अशोक बरकसे यांनी गंगापूरच्या दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर २४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

सहलीवरगेलेल्या पदाधिकाऱ्यांची पंचाईत : वाळूजच्यासरपंचपदाची निवड २६ आॅगस्टला होणार आहे. जोगेश्वरी, पंढरपूर, नारायणपूर, तळपिंप्री ग्रामपंचायतींची निवड २१ आॅगस्टला, रांजणगाव शेणपुंजी, लांझी सप्टेंबर रोजी होणार असल्याचे निवडणूक विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे सरपंचपदाचे दावेदार आपापले गणित जुळवण्यात मग्न आहेत. वाळूज, जोगेश्वरी, रांजणगाव शेणपंुजी, पंढरपूर ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच उपसरपंचपदासाठी इच्छुक उमेदवारांनी अज्ञात ठिकाणी सहलीवर पाठवले होते. त्यांच्यासोबत ‘चमकोगिरी’करणारे कार्यकर्ते ठेवले. या चारही ग्रामपंचायतींची आर्थिक उलाढाल मोठी असल्याने त्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील हाेते. परंतु आमचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने होऊ घातलेली सरपंच-उपसरपंचपदांसाठीची निवडणूक रद्द करावी, अशी मागणी जोगेश्वरीचे सरपंच योगेश दळवी ग्रामपंचायत सदस्य संजय दुबिले यांनी औरंगाबाद खंडपीठात केली होती. न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य करून जिल्हा प्रशासनाला गुरुवारी निवडणुका थांबवण्याचे आदेश दिले. या सर्व प्रकारामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या सरपंच उपसरपंचपदांच्या उमेदवारांची मोठी पंचाईत झाली आहे.

विद्यमान ग्रामपंचायतींचा कार्यकाळ २४ दिवसांचा
विद्यमानग्रा. पं.चा कार्यकाळ पूर्ण होण्यास २४ दिवस शिल्लक आहेत. सदस्यांना सहलीवर जाऊन पंधरवडा उलटला आहे. त्यामुळे सदस्य मंडळी घरी परतण्यासाठी उतावीळ आहेत. ज्यांना सरपंच उपसरपंचपदाचे वेध लागले आहेे त्यांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. आतापर्यंत सहलीवर झालेला खर्च पुन्हा २४ दिवस होणारा खर्च याचा ताळमेळ कसा बसवावा, या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. सदस्य परतल्यानंतर इतरांनी त्यांना उचलले तर... या शंकेनेही त्यांची झोप उडाली आहे. निवडणुका लांबल्याने ग्रा. पं. राजकारणाची समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.