आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत वाढली, ३१३ उमेदवारी अर्ज बाद, इच्छुकांचा हिरमोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्ह्यात ५८७ ग्रामपंचायती तर ३९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका ४ ऑगस्ट रोजी होत आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख २० जुलै होती. या दिवसाअखेर जिल्ह्यातील ९ तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयात १७,२४९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जाची मंगळवारी (२१ जुलै) छाननी करण्यात आली. यात वैध १४,६८५ तर ३१३ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले. यात सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आता प्रतिस्पर्धीला अर्ज मागे घेण्यास लावण्यासाठी घोडेबाजार रंगण्याची शक्यता आहे. त्यात या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस घेतल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे. दरम्यान, औरंगाबाद तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, औरंगाबाद, कन्नड, वैजापूर, गंगापूर, फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड, खुलताबाद या तालुक्यात येत असलेल्या ५८७ ग्रामपंचायतींची पहिल्या टप्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपत आहे. तसेच रिक्त झालेल्या ६० जागासाठी ३९ ग्रामपंचायतीमध्येही याचदरम्यान निवडणुका घेण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिक कार्यकर्ते व निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच गावात ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. आपण निवडणूक आल्यानंतर गावाचा कसा विकास घडवून आणू शकतो. तसेच आधीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी कोणती कामे केली कोणती नाही याचाही ते लेखाजोखा तोंडी मांडताना पाहावयास मिळाले. पण, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाल्याने निवडणुक लढवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांची चांगलीच धांदल उडाली. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी जात प्रमाणपत्र किंवा प्रस्ताव जात पडताळणीसाठी दाखल केल्याची पावती असणे अनिवार्य असल्याने अनेक इच्छुकांची शेवटच्या दिवसापर्यंत प्रस्ताव जात पडताळणी कार्यालयात सादर करण्यासाठी धावपळ सुरू होती. तर भरलेले उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात सादर करण्यासाठीही तालुक्याच्या तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे या तहसील कार्यालयालाही अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी यात्रेचे स्वरूप आले होते.

सात ग्रामपंचायती बिनविरोध
सिल्लोड तालुक्यातील टाकळी खुर्द, तळणी व पैठण तालुक्यातील पाचोड, आखतवाडा,तांदुळवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे. तर संभाव्यामध्ये पारूंडी तांडा, शेवता या ग्रामपंचायती बिनविरोध होण्याच्या शक्यता आहे. तर तारूपिंपळवाडी पोटनिवडणुकीसाठी एकही नामनिर्देशन पत्र आले नाही. तर गंगापूर तालुक्यातील प्रतापूर व वरझडी या दोन ग्रामपंचायतीची बिनविरोध झाल्या. तर वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव, मनेगाव, शिवगाव पाथ्री आणि नारळा ही गावे बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत.
महिलेच्या जागेवर पुरुषाचा अर्ज
सिल्लोड तालुक्यात ६९ ग्रामपंचायतीसाठी २,२०५ उमेदवारांनी २,२१६ अर्ज दाखल केले होते. मंगळवारी छाननीत २,१५८ अर्ज वैध तर ५८ अर्ज अवैध ठरले. जात वैधता प्रमाणपत्र अर्ज दाखल केल्याची पोहच पावती नसल्याने २१ अर्ज अवैध ठरले. तिसऱ्या अपत्यामुळे ८, अंगणवाडी सेविका असल्याने एक, शपथपत्रावर स्वाक्षरी नसल्याने १, वय कमी असल्याने तीन अर्ज अवैध ठरले. गव्हाली तांडा येथे पुरूष उमेदवारांने महिला राखीव जागेवर अर्ज दाखल केल्याने अर्ज अवैध.
निवडणूक कार्यक्रम : २२ व २३ जुलै रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख. २४ जुलै रोजी निवडणुक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप, ४ ऑगस्टला मतदान होईल. तर ६ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

या आहेत मोठ्या ग्रामपंचायती
-वैजापूर : िशऊर, खंडाळा, पालखेड, मनूर, गारज, बोरसर, परसोडा
- फुलंब्री : बाबरा, वडोदबाजार, गणोरी, निधोना, बोरगाव अर्ज
- सोयगाव : सावळदबारा, फर्दापूर, जरंडी, गोंदेगाव, बनोटी
- पैठण : पिंपळवाडी, आडूळ, विहामांडवा, आपेगाव
- गंगापूर : रांजणगाव शेणपुंजी, लासूरस्टेशन, जामगाव, वाळूज, घाणेगाव
- कन्नड : पिशोर, करंजखेड, नागद, चिकलठाण, अंधानेर, हतनूर, चिंचोली, औराळा, चापानेर, जेहूर, वडनेर
- खुलताबाद : राजेराय टाकळी, कसाबखेडा
- सिल्लोड : घाटनांद्रा, उंडणगाव, शिवना, भराडी, अंधारी
- औरंगाबाद : करमाड, पिंप्रीराजा,गाढे जळगाव, कुंभेफळ.
बातम्या आणखी आहेत...