आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूक: जल्लोष, मिरवणुकीची धूम करमाड, शेंद्र्यात सत्ता परिवर्तनाची लाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओरंगाबाद - डीएमआयसीअंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या करमाड व शेंद्रा कमंगर रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले आहे, तर कुंभेफळ येथील ग्रामपंचायतींची सत्ता सुधीर मुळे यांच्या काँग्रेसप्रणीत पॅनलने कायम ठेवली आहे.

औरंगाबाद तालुक्यात मंगळवारी ७२ ग्रामपंचायतींसाठी (४ ग्रामपंचायती बिनविरोध) मतदान झाले. या निवडणुकींचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला. यात करमाड परिसरातील ३३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. करमाड परिसरात लवकरच डीएमआयसीचे काम सुरू होत आहे. त्यामुळे शेंद्रा कमंगर, कुंभेफळ, करमाड येथील ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी अत्यंत चुरशीच्या निवडणुका झाल्या. करमाड ग्रामपंचायतींसाठी रंगनाथ सोळुंके व भगवान मुळे यांचे जनपरिवर्तन ग्रामविकास, डॉ. जिजा कोरडे व कैलास उकर्डे यांचे जय हो ग्रामविकास, तर भाऊराव मुळे व एकनाथ सोळुंके यांचे ग्रामविकास पॅनल निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत जनपरिवर्तन पॅनलचे कृष्णा उकर्डे हे एकमेव उमेदवार विजयी झाले, तर डॉ. जिजा कोरडे यांच्या सत्ताधारी पॅनलला विद्यमान उपसरपंच कैलास उकर्डे, बबलू तारव व सय्यद सुरैयाबी यांच्या रूपाने केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. भाऊराव मुळे व एकनाथराव सोळुंके यांच्या ग्रामविकास पॅनलचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. मतदारांनी त्यांच्या पॅनलच्या हाती सत्ता सोपवली आहे. ग्रामविकास पॅनलच्या विजयी उमेदवारांत दत्ता उकर्डे, रेखाबाई उकर्डे, शांताबाई कुलकर्णी, गीताबाई कोरडे, शीलाबाई राजू उकर्डे, सुमनबाई तारव, सुमीत कुलकर्णी, भाऊसाहेब कोरडे आणि साधना कुलकर्णी यांचा समावेश आहे. ग्रामविकास पॅनलचा विजय होताच गावात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊन विजयी उमेदवारांची हनुमान मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

औरंगाबाद तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी कुंभेफळ ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात काँग्रेसचे सुधीर मुळे यांना यश मिळाले आहे. या निवडणुकीत सुधीर मुळे यांच्या पॅनलच्या कांताबाई मुळे, विजय गोजे, चंद्रकला गोजे, संतोष शेजवळ, माया तिगोटे, गयाबाई शेजूळ यांनी बाजी मारली आहे, तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा उपसरपंच श्रीराम शेळके यांच्या पॅनलचे स्वत: श्रीराम शेळके, सुरेखा शेळके, छाया राऊळे, प्रमोद शेळके हे चार उमेदवार विजयी झाले आहेत.

नवतरुण पॅनला ६ जागा
शेंद्रा ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन झाले असून नवतरुण परिवर्तन ग्रामविकास पॅनलला ९ पैकी ६ जागा मिळाल्या आहेत. त्यात शुभांगी तांबे, शिवगंगा कचकुरे, किरण कचकुरे, पांडुरंग कचकुरे, रेखा तांबे, रेखा नवगिरे हे उमेदवार विजयी झाले आहे. तर सत्ताधारी ग्रामविकास पॅनलचे भास्कर कचकुरे, रमेश जाधव व नूरजहाँ पठाण हे विजयी झाले आहेत.

पुढील स्लाइड्सवर, वाचा इर काही महत्वाच्या ठिकाणचे निकाल....
बातम्या आणखी आहेत...