आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैजापूर- जिल्हा परिषद प्रशासनातील आठ तालुकास्तरावरील विभागांतील अधिकारी व कर्मचारी नियुक्त केलेल्या ठिकाणी वास्तव्यास आहेत की, नाही याची शहानिशा करण्यासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी गावपातळीवर विशेष ग्रामसभा घेण्याचा आदेश काढल्यामुळे कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.
आघुर(ता. वैजापूर) जिल्हा परिषद गटाचे सदस्य दीपकसिंह राजपूत यांनी जिल्हा परिषद सदस्यांच्या 8 जून रोजी झालेल्या स्थायी समिती बैठकीत सभागृहात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच गावपातळीवर काम करणारे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याने ग्रामीण भागातील विविध घटकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत नाही. अधिकारी खोटे कागदपत्र दाखवून मुख्यालयी वास्तव्यास असल्याचे भासवून प्रशासनाकडून 10 टक्के घरभाडे, भत्ता लाटतात, अशी तक्रार करून याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी बनकर यांच्याकडे केली होती. या तक्रारीवरून बनकर यांनी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मालोदे यांना एका पत्राद्वारे जिल्हा परिषदचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहतात का नाही याची शहानिशा करण्यासाठी ग्रामपातळीवर विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले असून या ग्रामसमभेच्या कामकाजाचा अहवाल स्थायी समितीसमोर सादर करावा, असे पत्रात नमूद केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.