आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालना, अाैरंगाबादसाठी ग्रीड नळ पाणीपुरवठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारने जालन्यासह अाैरंगाबाद अाणि नागपूर या जिल्ह्यांतील १७ गावांसाठी प्रादेशिक ग्रीड नळ पाणीपुरवठा याेजनेला मंजुरी दिली अाहे. जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा अाणि जालना तालुक्यातील १७६ गावे, अाैरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील मधील चापानेर गावात या याेजनेची अंमलबाजवणी करण्यात येणार अाहे.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लाेणीकर यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये या याेजनेच्या व्यवहार्यता अहवालाला मान्यता देण्यात अाली हाेती. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत या याेजनेला मंजुरी देण्यात अाली. या जिल्ह्यांतील १७६ गावांसाठी दरदिवशी ४० लिटर दरडाेई क्षमतेच्या अाणि १,८९७ दरडाेई खर्च असलेल्या २३४ काेटी ४१ लाख २८ हजार ९०० काेटी रुपयांच्या अाराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली अाहे. तर अाैरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील चापानेर गावासाठी ५ काेटी ८३ लाख रुपये देण्यात अाले अाहेत. नागपूरच्या कामाठी तालुक्यातील रनाळा क्षेत्रासाठी १७ काेटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात अाले अाहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या याेजनेची अंमलबजावणी करण्यात येणार अाहे. याेजनेची िकंमत वाढल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार राहणार नाही व अशा याेजना काेणत्याही टप्प्यावर रद्द करण्यास पात्र राहतील, असे स्पष्ट करण्यात अाले अाहे.

याेजनेचा फायदा
मराठवाड्यातील भूजलस्तर खालावला अाहे. त्यामुळे भूपृष्ठावर उपलब्ध असलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी ही याेजना राबवण्यात येणार अाहे. पाणीपुरवठा विभागाकडून हे पाणी जलकुंभांपर्यंत पाेहाेचविण्यात येईल. त्यानंतर घराघरांपर्यंत हे पाणी पाेहाेचवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची असेल. या याेजनेमध्ये १०० टक्के घरगुती नळ जाेडण्याचा समावेश करण्यात येणार अाहे. अस्तित्वात असलेले स्राेत बळकट करणे हे याेजनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने सांिगतले.
बातम्या आणखी आहेत...