आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: औरंगाबादमध्ये चौथा ग्रीन कॉरिडोर; ब्रेनडेड महिलेचे यकृत मुंबईला पाठवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इनसेट - रत्नामाला निनाळे यांचे 15 ऑगस्ट रोजी अवयवदान करण्यात आले. - Divya Marathi
इनसेट - रत्नामाला निनाळे यांचे 15 ऑगस्ट रोजी अवयवदान करण्यात आले.
औरंगाबाद- मराठवाड्यात अवयवदानाचा इतिहास रचणार्‍या औरंगाबाद शहरात आज (मंगळवारी) चौथा ग्रीन कॉरीडॉर उपलब्ध करून देण्यात आला.अपघातात गंभीर जखमी झालेल्या रत्नमाला निनाले (वय- 52) यांना ब्रेनडेड घोषित करण्‍यात आले. त्यांचे अवयव गरजू रुग्णापर्यंत पोहोचविण्यासाठी माणिक हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर ते विमानतळ असा पाच किलोमीटरचा ग्रीन कॉरीडॉर उपलब्ध करून ‍दिला. अॅम्ब्युलन्सने हे अंतर सात मिनिटांत कापले.
 
यकृत मिळणे असते अवघड
- शरीरातील इतर अवयवांपेक्षा यकृत मिळणे अवघड असल्याचे डॉक्टर म्हणाले. यकृत घेण्यासाठी मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलची खास टीम आलेली होती. तेथील रुग्णासाठी ते विमानाने पाठवण्यात आले. एक किडनी कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये, एक माणिक हॉस्पिटल,  तर डोळे औरंगाबादेतील एका आय हॉस्पिटलमध्ये दान करण्‍यात येणार आहे.

बीडमध्ये झाला होता भीषण अपघात...
रत्नमाला निनाले (वय- 52) या बीड येथील चिंचाळा रहिवाशी होत्या. रविवारी (13 ऑगस्ट) रत्नमाला निनाले यांचा अपघात झाला होता. त्यांच्या मेंदूला जबर मार लागला होता. त्यांना तातडीने औरंगाबाद येथील दुनाखे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. 14 ऑगस्टला सायंकाळी डॉक्टरांनी त्यांना ब्रेडडेड घोषित केले.

नातेवाईकांना पटवले अवयवदानाचे महत्त्व...
- ब्रेनडेड घोषित करणारे डॉ. शरद बिरादार यांनी रुग्णाच्या कुटुंबीयांचे अवयवदानाबाबत समुपदेशन केले. दु:खात बुडालेल्या नातेवाईकांना अवयवदानाबाबत सांगून त्यांनी या सत्कार्यामुळे इतर काही जणांचे प्राण वाचतील हे पटवून दिले. रत्नमाला निनाले यांच्या अवयवदानाविषयी नातेवाइकांनी तयारी दर्शवल्यानंतर रत्नमाला यांना शहरातील माणिक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. डॉ. उल्हास कोंडापल्ले आणि टीमने करून रत्नमाला यांचे अवयव - यकृत, किडनी, डोळे यशस्वीरीत्या सर्जरी करून काढले.

झोनल ट्रान्सप्लान्ट समिती अध्यक्ष डॉ.सुधीर कुलकर्णी माणिक हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रत्नमाला यांच्या दोन्ही किडनी आणि यकृत आणि डोळे प्रत्यारोपण करण्‍यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...  औरंगाबादेतील चौथ्या ग्रीन कॉरीडॉरचा व्हिडिओ आणि फोटो..
बातम्या आणखी आहेत...