आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगणेश: 2 एकरांत हरित महागणपती, भावी पिढीसाठी पर्यावरणाचे सिंचन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- खिर्डी (जि. औरंगाबाद) येथील २ एकर शेतात २०० बाय ४०० फुटांवर पेरणी करून पिकातून गणरायाची प्रतिमा साकारली आहे. औरंगाबादच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळाचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी गतवर्षी पाऊस कमी झाल्याने शेततळे उभारून पाणी साठवले. तेच पाणी पिकांना स्प्रिंकलरद्वारे दिले. यंदा तरी मोठा पाऊस पडावा, असे साकडे बाप्पांना घालत ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चा संदेशही देण्यात आला अाहे.

२ महिन्यांपूर्वी पेरणी
- दोन महिन्यांपूर्वी गणपती प्रतिमेचे रेखाटन करून १० किलो गहू, २० किलो मका, १०  किलो ज्वारी, २ किलो हरभरा पेरला. पीक ३ फुटांचे झाल्यावर गणपतीचा आकार प्राप्त झाला. यावर २५ हजारांचा खर्च आला.
- डोळे, हार, जानवे तयार करण्यासाठी बेडशीट, घोंगडी, चादर, मल्चिंग पेपर व फुलांचा वापर केला. पेरल्यानंतर स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले.

धान्याचा भंडारा, गरिबांना जेवण 
पिकातून २ क्विंटल ज्वारी, १५ क्विंटल मका उत्पादित होईल. त्याचा भंडारा करून निराधार वयोवृद्धांना जेवण, गव्हाचा चारा शेतकऱ्यांना दिला जाईल. 
बातम्या आणखी आहेत...