आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाकार संपूर्ण जगाचे असतात : ग्रेसी सिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी कलावंतांना भारतात काम करू देऊ नये, या मुद्यावरून भारतीय कलावंतांमध्ये वाद पेटला आहे. त्यात प्रख्यात अभिनेत्री ग्रेसी सिंगनेही उडी घेतली. या वादाबद्दल मला काहीच माहिती नाही, असे ती म्हणाली. मात्र, कलाकार कुठल्याची प्रांताचे नव्हे तर संपूर्ण जगाचे असतात, असे म्हणत पाकिस्तानी कलावंतांना भारतात काम करण्यास विरोध करणे योग्य नाही, असे तिने अप्रत्यक्षरित्या सूचित केले.
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय महोत्सव २०१६ अंतर्गत ‘कलाजागर’ या स्थानिक कलावंतांच्या व्यासपीठाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली की, मुन्नाभाई एमबीबीएस, लगाननंतर मला काही ऑफर्स आल्या. पण त्यातील भूमिकांना न्याय देऊ शकेल असे मला वाटले नाही. त्यामुळे मी त्या नाकारल्या. सध्या एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करत असून छोट्या पडद्यावरील ‘जय संतोषी माँ’ मालिकेत व्यग्र आहे. शासनाच्या अनास्थेमुळे रसिक शास्त्रीय नृत्याकडे पाठ फिरवत असल्याचा दावा तिने केला. या कलेच्या पुनरुज्जीवनासाठी होत असलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांना व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. ग्रेसी १४ ऑक्टोबरला वेरुळ महोत्सवात शिवशक्तीचे सादरीकरण करणार आहे.

महोत्सवात आज
१४ ऑक्टोबरला सायंकाळी वाजता महागामी संचालिका पार्वती दत्ता यांचे नृत्य होईल. यानंतर यास्मिन सिंग यांचे कथ्थक, सानिया पाटणकरचे शास्त्रीय गायन, पं. उद्धवबापू अपेगावकर आणि पूर्णश्री राऊतचे ओडिसी नृत्य, बर्ट कॉर्नलीस यांची सितार -मृदंग जुगलबंदीचा आस्वाद घेता येईल.
बातम्या आणखी आहेत...