आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिप्राय: घृष्णेश्वराचे दर्शन आता गाभार्‍याबाहेरूनच असावे; भाविकांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ- बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी अर्धवस्त्राची परंपरा बंद करावी किंवा पावित्र्य राखण्यासाठी गाभार्‍याच्या बाहेरूनच भाविकांना दर्शन द्यावे. या विषयावर भाविकांचे अभिप्राय मागवण्यात आले. दर्शन व रांगाचा लागणारा वेळ, अभिषेकासाठी दूध, दही, तुपासह वापरलेल्या चिकट पदार्थांमुळे शिवलिंगाची झीज होते. त्यामुळे भाविकांना गाभाºयाबाहेरूनच दर्शन द्यावे, अशी मागणी भाविक, ग्रामस्थांमधून होत आहे.

भाविकांना गाभाºयाबाहेरूनच दर्शन देण्यात यावे, याविषयी घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्तही सकारात्मक दिसत आहे. अभिप्रायामध्ये हाच मुद्दा आहे. अभिषेकांच्या वेळा ठराव्यात, इतर वेळी अभिषेक प्रतीकात्मक रूपात बाहेर व्हावेत व त्या अभिषकाचे तीर्थ आत जावे, नियमित पूजेकरिता मुख्य पुजार्‍यांनी गाभार्‍यात थांबावे अशी मागणी होत आहे.

पिंडीची झीज : आजपर्यंत या पिंडीपर्यंत प्रत्येक भाविकाला दर्शन घेता येते. तसेच येथे अभिषेक सुरू असल्याने शिवलिंगावरील दूध, दही, तूप, मध, साखर, पाणी यांचा वापर नेहमी होत असतो. पुन्हा आरतीच्या वेळी हे सर्व पाणी व ब्रशने धुतल्याने या शिवलिंगाची तीन ते साडेतीन इंचाने झीज झाली आहे. ही बाब तहसीलदारांच्या बैठकीत विश्वस्तांनी उघड केली आहे.

जुनी प्रथा
घृष्णेश्वर मंदिरालगतच येळगंगा वाहत असल्याने पूर्वी या नदीत अर्धवस्त्र किंवा सोहळ्यात स्नान करून मग घृष्णेश्वराचे दर्शन घेण्याची प्रथा होती. दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी झाले. यामुळे अर्धवस्त्राची प्रथा राहिली, परंतु शुद्धता राहिली नाही.

अभिषेकाच्या वेळा ठरवाव्यात
घृष्णेश्वराचे पावित्र्य राखायचे असल्यास भाविकांना गाभाºयाबाहेरून दर्शन देण्याचा निर्णय घेणे योग्य राहील. सुरुवातीला वाईट वाटेल. परंतु जवळपास सर्वच मंदिरांमध्ये हा नियम लागू आहे.
-योगेश टोपरे, कार्यकारी विश्वस्त

अभिषेक प्रतीकात्मक असावा
घृष्णेश्वर भगवंताचे रूप तेजोमय ऊर्जास्रोत जास्त झाल्यावर येणाºया सर्व भाविकांना मन:शांती मिळते. देवतेचे पावित्र्य अबाधित राहते. त्यामुळे भाविकांनी गाभाºया बाहेरूनच दर्शन घ्यावे. - - -दीपक शुक्ल, पुरोहित