आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक वेरूळ येथील र्शी घृष्णेश्वर मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. बुद्धगयेतील स्फोटांनंतर गुप्तचरांनी दिलेल्या अहवालानुसार वेरूळ येथील या मंदिर परिसरातही घातपाताचा धोका आहे. दरम्यान, पहिल्या र्शावणी सोमवारी लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यानिमित्त अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

एप्रिल व जुलै महिन्यात गुप्तचर विभागाने (आयबी) या मंदिराची पाहणी केली होती. घृष्णेश्वर मंदिरावरील संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन पोलिस यंत्रणा सतर्क करण्यात आली असून मंदिरासमोरील दुकाने हटवली जाणार आहेत.

कडक तपासणी : सध्या महिला व पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा करून संपूर्ण तपासणीनंतरच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. तसेच भाविकांकडील पर्स, मोबाइल, कॅमेरे मंदिर परिसरात नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या वस्तू ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे लॉकर रूम तयार करण्यात आली आहे. तसेच यंदा मंदिरासमोरील वाहनतळास बंदी घालण्यात आली आहे, असे ग्रामीण पोलिस अधीक्षक शैलैश बलकवडे यांनी सांगितले.

सोमवारी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित बैठकीत शैलेश बलकवडे यांनी सर्व पदाधिकार्‍यांना सुरक्षेविषयी माहिती दिली. या वेळी अध्यक्ष संजय वैद्य, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, भारतीय पुरातत्व विभागाचे पी. जी. देशमुख, तहसीलदार अनिता भालेराव, नाना ठाकरे, माजी सरपंच प्रकाश पाटील, दुकानदार असोशिएशनचे मकरंद आपटे, विजय भालेराव, अनिल आव्हाड, संजय आव्हाड, तलाठी लक्ष्मण जाधव यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

तीन वर्षांमध्ये अडीच इंच पिंड झिजली
गेल्या तीन वर्षांमध्ये घृष्णेश्वर महादेवाच्या पिंडीची मोठी झीज झाली आहे. तीन वर्षात पिंडीचा आकार अडीच इंचाने कमी झाला आहे, अशी माहिती मंदिर व्यवस्थापनातर्फे बैठकीत देण्यात आली. यावर भक्तांना गाभार्‍यात प्रवेशबंदी करण्याच्या शक्यतेवरही चर्चा करण्यात आली.