आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ground And Traditional Sport To Out Of Line In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनाला,शरीरास व्यायाम देणारे पारंपरिक खेळ हद्दपार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड: आधुनिकीकरणाच्या काळात वाढत्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वापरामुळे पूर्वीपासून खेळल्या जाणार्‍या बच्चे कंपनीच्या पारंपरिक खेळांची जागा आता टीव्ही संगणकाने घेतली आहे. पूर्वीच्या काळात खेळले जाणारे लपाछपी, चंफूल पाणी, लिंगोरचा, धप्पा कुटी, विटी दांडू, लंगडी, आंधळी कोशिंबीर, सागरगोटे, मामाचे पत्र हरवले आदी मनास आयाम आणि शरीरास व्यायाम देणारे खेळ हद्दपार होत चालले आहे. शाळेत किंवा सुट्यातदेखील खेळले जाणारे कबड्डी, खो-खो, कॅरम, बुद्धिबळ या खेळांचाही प्रभाव कमी झालेला आहे.
लहानपणी खेळले जाणारे हे गल्ली बोळातील खेळ आज दिसेनासे झाले आहेत. खेळण्यात दंग झालेली मुले, त्यांची खेळण्यातली एकाग्रता, खेळण्यातून निर्माण झालेला रुसवा, फुगवा, गल्ली बोळातील ती लहानग्यांची मौजमस्ती करणारी फौज, तहान-भूक विसरून रममाण होणारी ती बालके आज दिसेनाशी झाली आहेत.
आजची मुले सुटीमध्ये उज्‍जवल भविष्याच्या पालकांच्या अपेक्षेपोटी सुंदर गोंडस नावाचे समर कॅम्प, ऑलिम्पियाड, अबॅकस, सुंदर हस्ताक्षर, चित्रकला, इंग्रजी विषयाच्या शिकवणीत गुरफटून गेलेली दिसताहेत. त्यांच्या खेळामधील चोर पोलिसांची जागा आता काटरून्सने घेतली आहे. तर धबाकुटीने संगणकासमोर बसून प्रत्यक्ष खेळण्याऐवजी अँनिमेशनद्वारे चित्रित व्ही.डी.ओ. गेमद्वारे खेळताहेत.
स्पर्धेच्या युगात आपली मुले सर्वच क्षेत्रात सरस ठरली पाहिजे या पालकांच्या अपेक्षेमुळे मुले शारीरिक, बौद्धिक खेळांना हद्दपार करून एकाच ठिकाणी तासन्तास बसून अनावश्यक मनोरंजनाच्या दुनियेत गोवली जाऊन बालपण हिरावून बसली आहे. पालकही मुलं बाहेर खेळण्यापेक्षा घरात जास्त काळ कशी खेळात मग्न राहतील. या दृष्टीने मनोरंजनात्मक इलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करत आहे.
भविष्य काळात पारंपरिक खेळांचा समर कॅम्प, अत्यंत माफक दरात अशा प्रकारची जाहिरात आल्यास नवल वाटू देऊ नये. तेथेही पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी धावपळ करेल हे मात्र निश्चित.
>पारंपरिक खेळाच्या रुसव्या फुगव्यातून, जय पराजयातून, आपापसातील भांडणे व ती मिटवून परत एकादिलाने खेळणारे बालकांतील सामंजस्य, प्रेम, जिव्हाळा, खेळातून रुजवले जाणारे संस्कार तो आपलेपणा, एकाग्रता या सर्व बाबीही पारंपरिक खेळासोबत हद्दपार झाल्यात.’’
-राकेश निकम, क्रीडा प्रशिक्षक
>तासनतास संगणक, टीव्हीसमोर बसून व्हिडिओ गेम खेळणे, कार्टून्सच्या आहारी मुले जात आहे. जेवणाकडेही त्यांचे लक्ष राहत नाही. या बाबीमुळे अपचन, डोळ्यांचे आजार संभवतात. पालकांनी धावपळीच्या युगात मुलांच्या खेळांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे अत्यंत आवश्यक आहे.’’
-राजू गायकवाड, पालक तथा क्रीडापटू
>पाल्याच्या शिक्षणासाठी पालक अतिशय जागरूक आहे, परंतु खेळातूनही चांगले करिअर घडवले जाऊ शकते. खेळाकडेही करिअरचा दृष्टीने बघणे जरुरी आहे. जिल्ह्यातून ग्रामीण भागातून दज्रेदार खेळाडू पुढे आले पाहिजे. यासाठी क्रीडा विभागाने पावले उचलली पाहिजे.’’ विलास वाडेकर, माजी नगराध्यक्ष तथा क्रीडापटू
> पारंपरिक आणि आधुनिक खेळांची सांगड घालून मुलांना मोकळीक दिली पाहिजे. एकत्रित कुटुंबात असे खेळ, संस्कार मुलांना आणि आजी-आजोबांकरवी सहजरीत्या होतात.’’
-परेश जाधव, समाजसेवक
-आधुनिक खेळांसह पारंपरिक खेळ खेळण्यासाठी मुलांना पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. सुदृढ शरीरात सुदृढ मन वास्तव्य करते,
बदलाचे वारे पारंपरिक खेळांवर संगणक व काटरून्सचे अतिक्रमण, सांघिक खेळ, एकत्रित कुटुंबपद्धती व पारंपरिक आणि आधुनिक खेळांची सांगड आवश्यक
खेळ हरला अन् धंदा जिंकला..
आरोग्याचा खेळ : आंबा पिकतोय रसायनात
अक्षम्य दुर्लक्ष: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ