आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात जमावबंदी आदेश लागू, फिक्स पॉइंट वाढले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्‍मक फोटो
औरंगाबाद- मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील १९९३ मधील आरोपी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. शहरात नाकेबंदी, चेक पॉइंट,रेल्वेस्थानक, बसस्थानक, लॉज, हॉटेलची तपासणी सुरू करण्यात आली. सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, आरपीएफ, राखीव पोलिस दल, दंगा पथक, काबू पथक, विशेष शाखा, गुन्हे शाखा, चार्ली या सगळ्यांना पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचारी शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची विविध ठिकाणी तपासणी करत आहेत. पोलिसांच्या डॉग स्क्वॉडनेही रेल्वेस्थानक, बसस्थानकावर फिरवण्यात आले. शहरातील हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी लांब पल्ल्याच्या येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेवर, विमानतळावर बारीक नजर ठेवली आहे. शहरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.