आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Group Formation Ability To Increase The Movement

‘गटस्थापने’आधी ताकद वाढवण्याच्या हालचाली, मनपात स्थायी समितीच्या सदस्य संख्येवरून स्पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महापौर निवडीपासून शांत असलेले मनपाचे राजकीय वर्तुळ आता स्थायी समिती सदस्यांच्या निवडीवरून या आठवड्यात तापण्याची शक्यता आहे. १६ सदस्यांच्या स्थायी समितीत आपले संख्याबळ अधिक असावे यासाठी शिवसेना भाजपची फील्डिंग लावण्याचे काम सुरू झाले आहे.
महापालिकेच्या १६ सदस्यांच्या स्थायी समितीची स्थापना जूनपर्यंत होणे आवश्यक आहे. जूनला नवीन मनपाचा पहिला स्थायी समिती सभापती पदभार घेणार आहे. त्यासाठी स्थायी समिती सदस्यांची निवड ही मोठी महत्त्वाची प्रक्रिया होणे बाकी आहे. नियमानुसार निकालानंतर एका महिन्याच्या कालावधीत मनपात निवडून आलेल्या पक्ष अपक्षांचे गट स्थापन व्हायला हवेत. या गटस्थापनेनंतरच संख्याबळाच्या आधारावर कोणत्या पक्षाचे स्थायी समितीत किती सदस्य असतील हे ठरणार आहे.
सध्या शिवसेना भाजप हीच आकड्यांची जुळवाजुळव करण्याच्या कामाला लागले आहेत. २३ सदस्य असणाऱ्या भाजपला आपला गट किमान २९ ते ३१ सदस्यांचा असेल असा विश्वास आहे, तर शिवसेनेला ३५ च्या पुढे सदस्य संख्येचा गट असेल याची खात्री आहे. साधारणपणे सात सदस्यांच्या पाठीमागे एक स्थायी सदस्य असे गणित असल्याने नवीन स्थायी समितीत शिवसेनेचे पाच तर भाजपचे चार सदस्य असतील, असे आताचे चित्र आहे. याशिवाय काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले तर त्यांचे दोन किंवा एकट्या काँग्रेसचा एकमेव सदस्य असू शकेल. एमआयएमचे ते सदस्य असू शकतात. परंतु सदस्यांच्या निवडीवरून महापालिकेतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
असा असू शकतो कार्यक्रम
- २३ जानेवारीपर्यंत महापालिकेत गटस्थापना करण्याची मुदत राहू शकते
- या गटांना मान्यता मिळाल्यानंतर २५ अथवा २६ मे रोजी स्थायी समितीच्या सदस्य निवडीसाठी सर्वसाधारण सभा बोलावली जाऊ शकते
- २ जून रोजी स्थायी समिती सभापतीची निवड होणे गरजेचे आहे
मोठ्या गटासाठी आश्वासने महत्त्वाची
अपक्षांचे महत्त्व आता गटस्थापनेत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांना मित्रांना विशेष आश्वासने देऊन आपला गट तगडा करण्याचे प्रयत्न शिवसेना भाजप करीत आहे. शिवसेनेच्या सदस्य संख्येच्या जवळ जाण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असला तरी त्याला फारसे यश येईल असे दिसत नाही.