आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुल्कवाढीविरोधात आज विद्यापीठात आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विनाअनुदानित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वाढवलेले शैक्षणिक शुल्क रद्द करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा देण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, भारतीय विद्यार्थी सेना, स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया या विद्यार्थी संघटनांनी केली आहे. यासंदर्भात जुलै रोजी विद्यापीठात आंदोलन छेडण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विनाअनुदानित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक, प्रयोगशाळा ग्रंथालय शुल्कवाढीच्या मान्यतेचा निर्णय ३० जून २०१५ रोजी घेतला. विद्यापीठाच्या नवीन धोरणानुसार एमकॉम अभ्यासक्रमाची फीस हजार रुपयांवरून १० हजार रुपये, एमए अभ्यासक्रम २८०० वरून १२ हजार रुपये, एमएस्सी अभ्यासक्रम १७ हजार ८०० वरून ३५ हजार रुपये करण्यात आली आहे. वास्तविक, विद्यापीठ विभाग विद्यापीठाच्या उस्मानाबादेतील उपकेंद्रात असलेले विभाग सोडून अन्य महाविद्यालयांत चालणाऱ्या १५२ पदव्युत्तर विभागांत मूलभूत सुविधांचा अभाव आहे. १५२ महाविद्यालयांमध्ये केवळ पंधरा पदव्युत्तर शिक्षक आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार एक प्राध्यापक, दोन सहयोगी आणि चार सहायक प्राध्यापक असतील, तरच पदव्युत्तर विभाग सुरू करता येतो. ही वास्तव परिस्थिती असतानाही विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शुल्क वाढवले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ तसेच गारपिटीमुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. असे असताना शुल्कवाढीचा निर्णय घेण्यात आल्याने आता विद्यार्थी संघटनांनी एकत्रितपणे यास विरोध दर्शवला आहे. गुरुवारी, जुलै रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर विविध संघटनांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील विद्यार्थी गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळामुळे हैराण आहेत. शैक्षणिक बाबींसाठी लागणारा खर्च कसा करावा हा त्यांच्यासह पालकांना प्रश्न पडलेला आहे. मात्र, आता अचानक प्रशासनाने शैक्षणिक शुल्क दुपटीने वाढवले आहेत. हा प्रकार चुकीचा असून यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. प्रशासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. तुकारामसराफ , (विद्यापीठ प्रमुख, भाविसे )

चुकीचा निर्णय
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे वारंवार चुका होत आहेत. आता शैक्षणिक शुल्क तिपटीने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुष्काळामुळे विद्यार्थी होरपळत असताना त्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्याऐवजी त्यांचे नुकसान करणारेच चुकीचे निर्णय प्रशासन घेत आहे. अॅड.राहुल तायडे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस