आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीटीएलकडे ४१४ कोटींची थकबाकी,पूर्ण रक्कम वसूल करणार महावितरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रविवारी मध्यरात्री महावितरण जीटीएलला गाशा गुंडाळण्यास भाग पाडणार आहे. संपूर्ण कारभार स्वत:कडे घेणार आहे. जीटीएलकडे ४१४.१३ कोटी थकबाकी आहे, ती पूर्ण रक्कम वसूल करणार असल्याचे महावितरणने कळवले आहे.

महावितरणकडे जीटीएलची बँक गॅरंटी १५१ कोटी, ग्राहकांकडील बिल १५० कोटी, भांडवल व खरेदी केलेले विद्युत साहित्य ५० कोटी, पायाभूत आराखड्यासाठी ७० कोटी व इतर काही रकमा आहेत. या रकमा वळत्या करून घेतल्या जाणार आहेत. जीटीएलकडून येणे असलेल्या रकमेपेक्षा ही रक्कम काही प्रमाणात जास्त आहेत. त्यामुळे जीटीएलकडून संपूर्ण थकबाकी वसूल होत असल्याने हा करार रद्द केल्याने महावितरणचे कुठलेही आर्थिक नुकसान होणार नाही.

जीटीएलचा करार रद्द का केला?
जर महावितरणकडे जीटीएलची एवढी रक्कम होती तर जीटीएलचा करार थकबाकी असल्याने रद्द का करण्यात येऊ नये, अशी अंतिम नोटीस बजावली व करार रद्द करून सर्व कारभार स्वत:कडे घेण्यात येत आहे. माजी ऊर्जामंत्र्यांची ही कंपनी होती. सत्ता गेल्याने कंपनीच्या बाबतीत जास्त भानगडी वाढू नयेत, यासाठी हा करार रद्द करण्यात आल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे.