आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीटीएलकडे महावितरणचे २७८.७१ कोटी रुपये थकीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वीजबिल भरले नाही म्हणून महानगरपालिकेसह शहरातील ग्राहकांची वीज कापणाऱ्या जीटीएलनेच महावितरणचे २७८.७१ कोटी रुपये थकवले आहेत. अशा वेळी महावितरण कंपनी जीटीएलची वीज का कापत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील वीज ग्राहकांना चांगली सेवा मिळावी. वीज गळती वीज चोरीचे प्रमाण कमी व्हावे, वीज बिलांची रक्कम वेळेवर वसूल होऊन वीज वितरण व्यवस्था अद्ययावत व्हावी, उत्पन्नात भर पडावी, यासाठी शहरात पायलट ड्रम प्रकल्प राबवण्यात आला. त्याचे काम पूर्ण होत नाही, तोच मे २०११ रोजी जीटीएलला शहर वीज वितरणाचा कारभार सोपवण्यात आला. जीटीएल प्रभावीपणे काम करेल वीज वितरण व्यवस्थेत चांगली सुधारणा होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल, अशा सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा होत्या; पण प्रत्यक्षात जीटीएल चांगली सेवा देण्यास अपयशी ठरले. सर्वसामान्य वीज ग्राहकांनी वीज बिल भरले नाही म्हणून जीटीएल सक्तीने वीज कापत आहे. जीटीएलने महापालिकेची दोन वेळा वीज कापली होती. महावितरण औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात सर्वाधिक १४ ते १६ तास भारिनयम करत आहे. यामुळे दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकरी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दोन वर्षांपूर्वी कोटेशन भरूनही नागरिकांना वीज जोडणी मिळत नाही. यामुळे नागरिकांनी दाद कोठे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जीटीएलची वीज कापली जात नाही
शेतकरी,घरगुती, व्यावसायिका वीज ग्राहकांनी वीज बिल भरले नाही म्हणून महावितरण सक्तीने वीज कापते. मग जीटीएलने महावितरणचे २७८.७१ कोटी रुपये थकवले असताना त्यांची वीज का कापली जात नाही. तसेच पूर्वीप्रमाणे शहरात वीज वितरणाचा कारभार हाती का घेत नाही?
जयाजीसूर्यवंशी, निमंत्रक,जीटीएल हटाव कृती समिती.
१८ ते २० कोटींचे नुकसान
^वरिष्ठपातळीवर थकबाकीसंदर्भात चर्चा सुरू आहे. लवकरच हा विषय निकाली लागेल. दर महिन्याला लाख ते १.२५ लाख वीज ग्राहक वीज बिलाचा भरणाच करत नाहीत. त्यामुळे १८ ते २० कोटींचे जीटीएलला नुकसान सोसावे लागत आहे.
सुनीलवलावलकर, सहयोगीउपाध्यक्ष, जीटीएल.
प्रकाशगडावरून निर्णय
जीटीएलकडे१२ ऑगस्टपर्यंत २७८.७१ कोटींची थकबाकी आहे. वसुली संदर्भातील सर्व निर्णय प्रकाशगडावरून होतात. आम्हाला हस्तक्षेपाचे अधिकार नाहीत. वीज बिलाचा भरणा करावा कामकाजात सुधारणा करावी, यासाठी जीटीएलला तीन महिन्यांपूर्वी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. त्यानुसार त्यांनी काही रकमेचा भरणा केला. यापूर्वी वीज बिलाची रक्कम थकवली म्हणून १८ टक्के व्याजदराने ४२ कोटी रुपये वसूल केले आहेत.
मदनशेवाळे, कार्यकारीअभियंता, महावितरण
अशी आहे थकबाकी
७८३.५ कोटी कृषिपंप
२०२ कोटी घरगुती इतर
२७८.७१ कोटी जीटीएलकडे
४५.०८ कोटी महावितरणची शहरातील ग्राहकांकडील थकबाकी
अधिकाऱ्यांचे साटेलोटे
तीनवर्षांत जीटीएलच्या विरोधात सात हजारांवर तक्रारी आहेत. वीज गळती वीज चोरीचे प्रमाण १९ टक्क्यांवर आहे. महावितरणकडून खरेदी केलेल्या वजिेपोटी २७८.७१ कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे. या सर्व बाबींचा विचार करून महावितरणने तीन महिन्यांपूर्वी जीटीएलला करार रद्द का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीसही बजावली. मात्र, प्रत्यक्षात महावितरण जीटीएलच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे साटेलोट असल्याने कोणतीच कारवाई केली जात नाही.