आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीटीएलकडून दिरंगाई: शहानूरमियाँ दर्गा भागात 22 तास वीज खंडित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहानूरमियाँ दर्गा आणि देशपांडेपुरम भागात सोमवारी सायंकाळी सात वाजता खंडित झालेला वीजपुरवठा मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पूर्ववत झाला. जीटीएलच्या एकूणच कारभारामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागला.

देशपांडेपुरम आणि शहानूरमियाँ दर्गा परिसराला विद्युत पुरवठा करणारी 11 केव्हीची विद्युत वाहिनी जीर्ण झाल्याने या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो. सोमवारी पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी जीटीएलच्या जवळील ग्राहक सेवा केंद्राला माहिती दिली. रात्री 12 वाजेपर्यंत पुरवठा सुरळीत होईल, असे अधिकार्‍याने सांगितले. 22 तास उलटल्यानंतर पुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांना सोमवारची रात्र अंधारात काढावी लागली. सोमवारी सायंकाळी सात वाजता पुरवठा खंडित झाल्याची माहिती ग्राहक केंद्र सेवा, अधिकार्‍यांना दिली, पण पुरवठा पूर्ववत करण्यासाठी 22 तास लावले, असे रहिवासी प्रेषित रुद्रवार यांनी सांगितले. दरम्यान, 11 केव्ही विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याने पुरवठा खंडित झाला होता. ही वाहिनी जीर्ण झाली असल्याचे जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक यांनी सांगितले.