आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल उशिरा दिल्यास जीटीएल, महावितरणला दंड ठोठावणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वेळेत वीज बिल मिळाले नाही अशी तक्रार केली आणि त्याचा निपटारा 24 तासांत झाला नाही, तर जीटीएल किंवा महावितरण कंपनीला दर आठवड्याला 100 रुपये दंड होणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नवीन अधिनियमात हा निर्णय समाविष्ट करण्यात आला आहे. आयोगाचे ग्राहक प्रतिनिधी हेमंत कापडिया यांनी या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सविस्तर माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, वीज कायदा 2003 अमलात आल्यावर आयोगाने 20 जानेवारी 2005 रोजी वीज वितरण कंपन्यांसाठी दोन वेगवेगळे अधिनियम जाहीर केले. ते महावितरण, रिलायन्स, टाटा वीज कंपनीला लागू झाले.
वीज ग्राहक गा-हाणे मंच, विद्युत लोकपाल व राज्यातील 14 वीज ग्राहक गा-हाणे मंच दोन्ही अधिनियमांनुसार काम करत होते. विद्युत पुरवठा सुरू करण्याचा कालावधी, कृती मानके, नुकसान भरपाईविषयी अधिनियमांत कोणतेही स्पष्टीकरण नव्हते. त्यामुळे ऑ गस्ट 2013 मध्ये पुणे येथे तीन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यास विद्युत लोकपाल, मंचाचे सदस्य, आयोगाने नियुक्त केलेले ग्राहक प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार 20 मे 2014 पासून सुधारित अधिनियम लागू करण्यात आले आहेत.